तो जागा कांटेकुटेरी झाडांनी अगदी व्यापून गेली
होती. सुगीच्या आमदानीत एका दिवशी प्रखर ऊनः
पडले असतां, नरसू हा एका कांटेरी झाडाच्या छायेत
बसला होता. एक गांवकरी मनुष्य, धन्यानें गच्च
भरलेला आपला गाडा हॉकीत त्याच वाजूनें चालला
होता. नरसूनें त्या भरलेल्या गाड्याकडे मात्सर्यदृष्टीने
पाहिलें, परंतु त्या मनुष्यास रामराम देखील केला नाही.
तो गांवकरी मनुष्य तसाच उभा राहून, नरसुस
ह्मणाला, " ही जी इतकी ओसाड जमीन तुझ्या
ताब्यांत आहे, सोपैकी तुझा या आळशी शरीराने
हल्ली जितकी व्यापिली आहे, तितकी जरी दररोज
खणीत गेलास, तरी तूं ह्या गाड्यांत भरलेले धान्य
पहात आहेस त्याहून पुष्कळ जास्त धान्याची दर
वर्षी कापणी करशील. "
हा उपदेश नरसूच्या मनांत ठसला. त्याने ती सर्व
लहान सहान कांटेरी झाड़ें व झुडपे उपटून काढून त्या
जमिनीची चांगली मेहनत मशागत केली; आणि
तेर्णेकरून त्याला एक पैसाही खर्च न करता, चांगले
शेत मिळाले; त्या शेतानें, नरसूचे व त्याच्या कुटुंबाचें
विपुलतेने उदरभरण चालविले.
एक वृद्ध पिता अगदर्दी मरणोन्मुख झाला असतां,