Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)

 सदाशिव सावधानी दुसऱ्याच गोष्टीस आरंभ के- ला, ते झणाले, “ मोगलकारकीर्दिआरंभी ने सरदार होते, त्यांचे ऐश्वर्य पेशवाईतील सरदारांस नव्हते; आणि पेशवाईतील सरदारांचे ऐश्वर्य हल्लांच्या सरदा- शंस नाहीं. हल्लींच्या सरदारांची ती कुंमारी थाटाचौ घोडी व तो हांकण्यास उपयोगी पडणारे जोंधळे- ताटी माले, आणि उघड्या जागेवरील खुली पांगा पाहिली ह्मणजे पेशवाईतील सरदारांचे घोडे, भाले, पागा, पुष्कळ पटीने सुंदर व जोमदार दिसत. मोंगल- कारकीर्दीतील स्थिति पेशवाईपेक्षाही शतगुणित अ- चिक चांगली होती. त्या वेळच्या एका सरदाराची पागा इतकी मोठी होती कीं, तीकरितां काशीपा- सन रामेश्वरापर्यंत मांडव घातला होता. "
 रामभङजी धूर्ताव्याने ह्मणाले, " त्या वेळच्या त्याच सरदाच्या शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका सरदाराचा भाला काशीपासून रामेश्वरापर्यंत लांबीचा होता असे ऐकण्यात आहे. " ही गप्प असावी असे वाटून सदा- शिवशासचानी प्रश्न केला, " इतका लांबीचा माला ठेवण्यास जागा नको काय ?"
 रामभटजी म्हणाले, " कां ? तुमच्या सरदाराच्या पागेचा मांडव नव्हता काय ? त्यावर ठेवीत असतील."
 सदाशिवशास्त्रघानी, येथेंही आपली छाप बसली नाहीं असे पाहून तिसऱ्याच गोष्टीवर उड्डाण केले. ते सांगू लागले, " श्रीमंत धोरले माधवरावसाहेब यां च्या लग्नसमारंभाचा घाट मोठ्या बहारीचा उडाला. ब्राम्हणभोजनेंही यथेच्छ झाली. पकानांविषयों