Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

अस्तमानसमयीं ओटय़ावर सतरंजी पसरून तंबाकू फ/फीत व शिळोप्पाच्या गोष्टी बोलत बसली असतां, गोष्टी ऐन रंगांत आल्या व एकावर एकाची कडी चढू लागली. तेव्हां अर्थात् त्यांत खोटसाळपणा, अ- तिशयोक्ति, असंबद्धता वगैरे गुणांचे मिश्रण आलेच |
 सदाशिवशास्त्री ह्मणाले, " मी लहानपणीं आ पल्या आजोबांबरोबर काशीस गेलो होतो, तेव्हां मा- गीत एक पोकळ्याचा वृक्ष पाहिल्याचे मला स्मर्ते ! पोकळ्याचा वृक्ष झटल्याबद्दल, रामभटजी आपणास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तो तसाच मोठा होता. त्याचे छायेखाली विश्रांतीसाठी सहस्रावधि मंडळी वसली होती.यावरून, केवळ ' एरंडोपि द्रुमा' या न्यायाने मी कांही त्यास वृक्षत्व दिले नाहीं असे तु मच्या सहज लक्षांत येईल.
 रामभटजी झणाले, " हो ! हो ! आपण सांगतां त्यांत कांही अन्यथा नसेल; कारण मी आपल्या हानपणी असेच एक आजस्त्र प्रकरण पाहिले होते:- एक तांब्याचें तपेलें तयार होत होते, ते घडण्याकरिता त्या तपेल्याच्या भांत लक्षावधि तांबट बसले होते. एवढे हें अवाढव्य तपेलें कशाकरिता तयार होत अ- सेल याची कल्पना त्या वेळी मला कांहींच करितां आली नाही. परंतु आतां खास अनुमान होते की, तुमचा तो पोकळ्याचा वृक्ष शिजविण्यासाठीच ते तयार होत असावें. नाहीं बरें ? " खूण पटून मनाची संशयनिवृत्ति झाल्यावर सदाशिवशास्त्री नाही कशास ह्मणतात.