Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४१)

 बंडूला आपल्या भाषणाचा नेहमी अभिमान असून तो सदोदित कांही तरी गप्पा झोंकणाराच मनुष्य होता. तो झणाला,“ हे कांहीं इतके मोठे आश्चर्य करण्यासारखे कांदे नाहीत. मी आपल्या प्रवासांत एका प्रसंगी एक कोबीचा कांदा पाहिला होता, तो, स्या पलीकडच्या घराएवढा मोठा होता ! "
 येसु, जातीचा तांबट होता, तो बंडूचे भाषण ऐ.. कून म्हणाला, " हें, तूं कांही तरी अतिशयोक्तीने सांगत आहेस; परंतु मी एक वेळ एक तपेले तयार करण्याच्या कामावर मदतनीस होतो, ते तपेले मात्र तूं दाखविलेंस त्या घरापेक्षां फारच मोठे होतें. "
 बंडू म्हणाला, " तुझे बोलणे खरें किंवा खोटे ईश्वर जाणें ! परंतु इतके मोठें हैं तपेले, कशाकरतां बरें तयार केले असावे ? " येसू म्हणाला,तूं पाहिलेला मोठा कोचीचा कांदा त्यांत शिजवावा अशीच त्यांची वास्तविक इच्छा असेल | "
 बंडू लाजल्यासारखा होऊन म्हणाला, "तुझ्या बोलण्याचा रोख माईया लक्षांत आला. तुला नेहमीं सत्य भाषणाचीच आवड आहे, तूं जे मातां कांही मिथ्या भाषण केलेस तें केवळ माझ्या गर्विष्ठ व खोड- साळ भाषणाचा उपहास व्हावा एवढ्याकरतांच होय. श्यापासून माझे समाधान झाले पाहिजे. "

जशास तसा भेटे, मनीचा संशय फिटे,
२७ सदाशिव शास्त्री आणि रामभट.

 सदाशिवशास्त्री आणि रामभट अशी वृद्ध जोडी