Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)

हागीरदार, " बरें तर आतां तूं ज्या अर्थी, त्याकरितां इतकी मजवर सक्ति चालविली आहेस, त्या अर्धी मी तुझ्या नजराण्याचा स्वीकार करतोच. तुझे मजविषयों इतके विशेष उदारत्व आहे तेव्हां मलाही कृपण होतां येत नाही. हणून तुझ्या रेडकाच्या किमतीपेक्षा दुप्पट तिप्पट ज्यास्त किंमत मला ज्या वस्तूची पडली आहे तीच वस्तु मी तुला त्याऐवज परत नजराण्यास देतो. असे म्हणून त्यानें त्यास तें प्रसिद्ध सुरणकूल दिले ! ते घेऊन तो निमूटपणे चालता झाला.

मोहक कपटांचा अगोदर अवरोध कर,
नाही तर त्यांचा पगडा बसल तुजवर.
२५ कोबीचा कांदा.

एका संसारदक्ष वाईनें आपल्या बागांत सर्व प्रकारचा भाजीपाला लाविला होता. एके दिवशी ती आपल्या खडी नांवाच्या मुलीस ह्मणाली, " खडे, त्या कोनी- च्या पानाच्या खालच्या बाजूस लहान, सुंदर, पिंवळे, बारीक कण दिसताहेत, ते तूं पाहिलेस काय ? तीं बारीक बारीक अंडी आहेत, त्यांपासूनच सुंदर रंगांचे परंतु नाशकारक सुरवंट ( घुले ) उत्पन्न होत असतात. आज दोनप्रहरून ही सर्व पाने शोधून पहा, आणि अंडी चिरडून टाक, ह्मणजे आपली ही कोबी सदोदित चांगली हिरवीगार आणि सुरक्षित अशी राहील. "
 लाडीस वाटले, हे काम आज दोनप्रहरीच केले पाहिजे असें नाहीं, लें केव्हाही केले तरी चालेल