भरलेल्या जड पाट्या डोकीवर घेऊन शहरांत गेल्या.
जातांना वाटेत भीमा वरचेवर कण्हूं, कुयूं व पुट्पटूं
लागली; परंतु वालू तिची थट्टा करून हंतूं लागली.
भीमा म्हणाली, " तुला इतके हरूं करें येतें ? तु-
झी पाटी माझ्या सारखीच जड आहे, आणि तूं ह्मणजे
माझ्यापेक्षा अधिक सशक्त आहेस असेंही नाही ! "
बालून उत्तर केलें, - " मी आपल्या ओझ्यावर एक
विशेष प्रकारची लहानशी वनस्पति ठेविली आहे; त्या-
मुळे या ओझ्याचे मला कांहींच वाटत नाही. "
भीमा म्हणाली, " खरेंच का ? तर मग ती लहान-
श्री परंतु विशेष मूल्यवान् वनस्पति असली पाहिजे !
तरमग तिच्या योगार्ने मला माझेही ओझें हलके
करता येईल. मी तुला हात जोडते, ती वनस्पति
काय आहे ती कृपा करून मला सांग."
बालूने पुनः तीस नोट समजावून सांगितले, - " ती.
अमूल्य लहान वनस्पति, जी सर्व अवघड गोष्टो सववड
करते, जी सर्व असह्य दुःखें सह्य करते, जी जड
ओझे हळकेफुल करते , ती जनस्पति सहिष्णुता होय.
भीमा, लक्षांत ठेव."
एका गरीब मजूरदाराच्या वाडग्यांत एक सुरणाचे
फूल फारच मोठे उगवलें होतें, ते पाहून त्याचा चमू-