पुष्कळ आभार मानले; परंतु आपल्या मित्राच्या कृतोप-
काराचा मी उतराई कुमा होईन याच गोष्टीचा लास
निदिध्यास लागला. विचार करता करतां आपल्या
मित्राचे उनकार फेडण्याची त्यास सुचलेली युक्ति त्याने
केली, ती खाली दिल्याप्रमाणे :-
त्याने दोघां बदमाश लोकांस पैसा देऊन वश क·
रून घेतले, आणि सांगितलें कीं, माझा अमुक मित्र,
आनक्या वार्गेन, अमुक वेळीं, नित्यशः फुले तोडावयास
जात असतो, त्यास गांठून तुझी चांगला चोप द्या;
त्या वेळी मी पलीकडे काही अंतरावर दडून बसलेला
असेन तेथून मी ओरडाआरड करून मदतीस येऊं
लागलों हाणजे तुझी पळून जा झणजे झाले. याप्रमाणें
त्यानें योग घडवून, आपल्या मार खाऊन जर्जर झा
लेल्या मित्रास आपल्या पाठुंगळीस घेऊन घरी आणले
व आपल्याप्रमाणेच त्याचा पथ्यपाण्याचा व औषधी-
उपचाराचा बेत राखून त्यास बरें केले व त्याच्या
ऋणांतून मुक्त झाल्याबद्दल धन्यता मानिली.अशा
मित्राचा काय उपयोग वरें ?
दोघी मजूरदारणी, भीमा आणि बालू,फळांनों