Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 या लहानशा पुस्तकास छोटीशी प्रस्तावना जोड- ण्याचें वास्तविक झटलें झणजे कांहीं कारण नाहीं. या पुस्तकांच्या नांवांवरून यांतील विषयाचा सहज निर्देश होणार आहे. तथापि, येथे एक मुद्द्याची गोष्ट कळवावयाची आहे, ती ही कीं, मनोरंजक गोष्टींची पुस्तकें वाचन विद्यार्थ्यांची मनें बिघडतात असा सर्व- साधारण समज आहे, व तो कांहीं खोटा नाहीं; परंतु हैं पुस्तक त्या समजास अपवादक होईल अशीही खात्री आहे. कारण, चावट किंवा छचोरी, मनोरंजनाच्या गोष्टी यांत नसून, उलट हरएक गोष्ट सदुपदेशावह अ- मून, तीपासून होणारें मनोरंजन सुफल देणारे आहे. याची सत्यता प्रत्ययास येऊन जनाश्रय मिळाल्यास असेच दुसरेही पुस्तक छापविण्याचा विचार आहे.

पुस्तककर्ता..