Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )

तो ह्मणाला,“ ईश्वराने माझ्या डोळ्यांच्या खरोखरच खांचा केल्या आहेत; परंतु तुझें कसे काय आहे ? नुजप्रमाणेच केवळ नाहीं पण अन्य तऱ्हेचे शब्द उच्चार- ण्याच्या बेतांत मी आलो होतो, परंतु विचार केला कौं, मजसारखाच जर हा मनुष्य अंधळा असला तर ! याकरतां प्रथम तपास करावा व मग बोलावें. आणि त्यासाठीच माझा वरील प्रश्न आहे. "
 आतां या डोळसानें त्याच्या प्रश्नाचा जवाब देणे ह्म- णजे आपणास शतमूर्ख म्हणून घेणें आहे ! याकरितां जबाब न देतां तो मुकाट्याने चालता झाला कसा !

ईश्वर हरएक गोष्ट, आपल्या कल्याणार्थ करतो,
परंतु नेहमीं आपला अभिमानच त्यास आडवा येतो.
१२ झरा.

 एका कडक उन्हाळ्याच्या दिवशी,वामन नांवाचा मुलगा भरउन्हांतून शेतावर गेला.मखर उष्णतेनें त्याचे गाल लालभडक होऊन तोंड अगदीं गोरेमोरें होऊन गेलें, आणि तृपेनें त्याचे प्राण व्याकूळ झाले. तेव्हां तो एका झन्यावर आला, तो झरा एका हिरव्या- चार उंबराच्या छायेखाली असून, खडकांतून झुळ झुळ वहात होता, त्याचें उदक चांदीसारखें चक- चकीत होतें.
 उष्णतेच्या तलखीनें बेहोप झालेल्या मनुष्याने