Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

मात्र दुसरा कोणी नाहीं. " घरांत असून नाही म्हणून सांगणे, आणि आपण उन्हांत फिरून दुसन्यास दोप देणे या मूर्खपणांबद्दल उभयतांसही लाज वाटली.
 २ एक प्रवासी मार्गात दोन प्रहरच्या वेळी स्नान व फराळ करण्यासाठी नदीतीरीं उतरला. प्रथम एक धोतर धुऊन त्यानें वाळवंटीवर वाळत घातले, व आ पण स्नान करण्याकरितां गेला. स्नान करून परत धोतर नेसण्यास येतो, तो त्या धोतरावर, चिखलानें ल डवडलेल्या पायाचें एक गाढव उमें होतें तें त्यानें पा हिले, तरी अविचाराने संतप्त न होतां, शांतपणें ह्म- णाला, " कोणा मनुष्याचे हातून अर्से कृत्य घडर्ते तर मी त्यास गाढव झटले असते, परंतु आपली प्रत्यक्ष मूर्तिच उभी राहिली तेव्हां आतां काय ह्मणावयाचे आहे! हात जोडून एकीकडे होण्याविषयी प्रार्थना करतो आणखी काय ? "
 आतां हा मनुष्य कोधाधीन होऊन त्या गाढवास गाढव ह्मणता किंवा दोन टिकोरी लगावता तर त्याची त्याला कांही लाज वाटली असती काय ? उलट याचा मात्र मूर्खपणा बाहेर पडता !
 ३ एक मनुष्य विचारांत गर्क होऊन गैरसावध रीतीने रस्त्यांतून चालला असतां त्याची दुस- च्या समोरून येणाऱ्या इसमाशी धडक बसली; तीसरसा हा सावध होऊन त्या इसमास ह्मणतो, " कां तुझे डोळे फुटले का ? तुला मनुष्य दिसत नाही, बेलाशक धडक देतोस ती ? "
 समोरून येणारा तो इसम खरोखरीच अंधळा होता.