आला. " कोण आहेरे मूर्ख मुलगा " असें तो पुनः
ओरडला, आणि झाडींतून "मूर्ख मुलगा" असा प्रति-
ध्वाने झाला.
जगू रागावला, आणि गाढव, लुच्च्या, सोदा, अशा
शिव्या देत सुटला. त्या शिव्या झाडींतून प्रति-
ध्वनि उमटून जशाच्या तशाच परत आल्या. त्या
काल्पनिक मुलाचा सूड उगवावा म्हणून त्यानें सर्व
झाडी शोवली; परंतु कोणीच सांपडला नाहीं.
यानंतर जगू घरों आपल्या आईकडे पळत गेला,
आणि गान्हा सांगू लागला की, "झाडीत एक दुष्ट
मुलगा लपला आहे त्याने मला शिव्या दिल्या. "
आईने सांगितलें: " या वेळीं तूंच आपणा स्वतः-
सच दोषी ठरविलेंस. तूं आपल्या स्वतःच्या शब्दांच्या
प्रतिध्वनीशिवाय दुसरे काहींच ऐकिले नाहीस.
जर करतां तूं त्या झाडीत ममत्वाचें भाषण करतास,
तर त्याच्याबद्दल तुला ममत्वाचे शब्दच मिळाले असते.
" या एकंदर आयुष्यांत आपणास असेच प्रसंग
येतात. दुसऱ्यांचें जें काय वर्तन आपणाशीं घडतें,
तें बहुतेक आपले वर्तन त्यांच्यांशी घडते त्याचें अनु-
करण प्रतिध्वनीत्वच असतें. आपण दुसऱ्यांश मि-
त्रत्वाने वागले; तर दुसरेही आपणाशी मित्रत्वानेंच
वागतील. आपण जर त्यांच्याशी दाडगेपणानें, कप-
टानें, आणि अमित्रत्वानें वागलों तर, त्याचा मोबदला
त्याहून जास्त चांगला मिळण्याची आपणास आशा
करणें नको. "
पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/१९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )