Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४ )

 अशा प्रकारें मुलांच्या किंवा अज्ञान जनांच्या पुष्कळ गैरसमजुती झालेल्या असतात:- कोणी म्हणतात, वोज लवते न लवते तो दगड शोधून पदरांत बांधिला असतांवें सोनें होतें. कोणी म्हणतात, विजेची चमक होऊन तिचा प्रकाश नष्ट झाला नाहीं तो त्या प्रकाशांत, जिभेने खणून, पापणीनें माती काढावी; फार नाहीं, एक बोटभर खोल खाडा झाला की, त्यांत जड- जवाहीर दिसूं लागते. आतां अशा प्रकारच्या गैर- समजुती त्यांच्या बुद्धीनेंच झालेल्या असतात असे नाहीं, तर आईबापांनी दंतकथा सांगूनच अशा प्रका- रचें मिथ्याज्ञान त्यांजमध्यें उत्पन्न केलेले असते; तर असें करण सवाशा अयोग्य होय.

जसा तुझा आवाज जंगलांत जातो
तसाच तो वाईट किंवा चांगला परत येतो.
१० प्रतिध्वनि

 एका लहान जगूस प्रतिध्वनीविषयों कांहींच ज्ञान झाले नव्हतें. तो एका दिवशी कुरणांत मोठ्यानें "हू, हूप म्हणून ओरडला. त्या कुरणालगतच एक झाडी होती तींनून कोणी तरी 'हू, हूप' असा ज बाव दिल्याचे त्याने लगेच ऐकिले. याचें आश्चर्य वा टून त्यानें “ तूं कोण आहेस ? असा प्रश्न केला आणि पचाय तूं कोण आहेस " असा उलट प्रश्न