वाई ह्मणाली, " मला तुझ्याशी कांहींच कर्तव्य
नाहीं, व तुला ह्मणून मी हांकही मारली नाहीं, माझा
लहान परसू पलीकडल्या ओढ्यांत बदकें राखीत आहे,
तो या वावटळीमुळे येथेंच कोठें लपला असेल त्यास
मी हांक मारली. पहा ! तो, त्या झुडपांतून इकडे-
सच येत आहे ! "
नगरवासी परशूनें त्या बाईची आरोळी आकाश-
वाणी ह्मणून कशी मानली; याचे कारण तीस सांगितलें.
बाई गहिवरली आणि हात जोडून ह्मणाली,"अरे
माझ्या मुला ! तूं या बाबतीत ईश्वराचे आभार किमपिही
कमी मानूं नको. ही वाणी (आरोळी ) एका गरीबशा
शेतकरी वाईच्या मुखाने झाली ही गोष्ट खरी आहे;
परंतु तुझी माझी मुळींच ओळख नसतां, तुझें नांव
घऊन मी जोरानें ओरडावे ही ईश्वरी प्ररेणाच होय !
तूं ज्या संकटांत पडला होतास त्यांतून तुझी सुटका
करणारा तोच सर्वशक्तिमान् परमेश्वर होय. "
परशुराम साश्रु होऊन झणाला:-" होय, होय !
ईश्वरानें माझें संरक्षण करण्यासाठी तुझ्या वाणीचा
उपयोग केला. तूं ओरडलीस हे सत्य आहे; परंतु
मदत देवाने पाठविली यांत संशय नाही. कारण
वृद्धवचन असे आहे."
एका चिताऱ्याने एका बोहऱ्यापासून एक प्रकारचा