Jump to content

पान:वृद्धवचनकथासार पुस्तक पहिले.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)

जाऊन रानांत करवंदें तोडीत होता. फरवंदें तोडून पुनः घराकडे परत फिरण्याची त्यास इच्छा झाली; इतक्यांत वावटळ उठून पाऊस पडू लागला, व विजा "चमकूं लागून वडघडाटही सुरू झाला. परशुराम अगदी घावरून जाऊन, रस्त्यानजीकच एक मोठा वडाचा वृक्ष होता त्याच्या ढोलीत घुसला. कारण, मो- ठ्या उंच वृक्षावर वीज नेहमीं हटकून पडतेच याचें त्यास ज्ञान नव्हतें.
 तो ढोलीत घुपनो न घुसतो तों, पुढील शब्दांची ओरड त्याच्या कानी पडली: "परशुराम ! परशुराम ! ये, अरे, लौकर बाहेर ये. "परशुरामं त्वरित ढोलो. बाहेर आला मात्र, डोळपाची पापणी लवंते न लवंते इतक्यांत त्या झाडावर वीज पडलीच, व मेघगर्जनाही मोठी भयंकर झाली. त्या भयचकित झालेल्या मुला- च्या पायाखालची जमीन डळमळली व आपण केवळं अमीत उभे आहोत असे त्यांस भासले. परंतु त्यास कोणत्याही प्रकारें इजा मात्र झाली नाही. त्याने हात जोडून प्रार्थना आरंभिली. तो हणालाः –" हो आकाशवाणीच झाली ! हे दयालू परमेश्वरा ! तूंच माझें संरक्षण केलेंस ! तुझा मी मोठा आभारी झालों ! " अशी तो प्रार्थना करीत आहे इतक्यांत त्यानें पुनः आरोळी ऐकली: –" परशुराम ! परशुराम ! तुला माझे बोलणे ऐकूं येत नाही काय ? " आणि आतां मात्र त्यानें पाहिलं की, ही ओरडणारी एक शेतकरीण बाई आहे. तो लगबगीनें तिजकडे जाऊन ह्मणाला, "हा भी आलो. तुला माझ्याशी काय कर्तव्य आहे ? "