Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्वात. श्लोक. नमूनि देवदेवातें रसिकस्वांततर्पण || बालबोधार्थ करितों अल्प हैं वृत्तदर्पण ॥ १ ॥ छंदें वृत्ते संस्कृतांत वर्णिली असती मुळीं ॥ पाहून त्याच रीतीनें देशैभाषेत सांगतों ॥ २ ॥ काव्य दोन प्रकारचें आहे; एक गद्यरूप आणि एक पद्यरूप ज्याला पाद नाहीत तें गद्य, आणि ज्याला पाद आहेत तें पद्य. पद्या- च्या अक्षरैनियमाला व मात्रानियमाला छंद किंवा वृत्त असें ह्मणतात. छंदाविषयीं संस्कृत भाषेंत पिंगलादिकांनीं नियम सांगितले आहेत, ते प्राकृत जनांस समजण्याकरितां त्याच नियमांच्या आधाराने त्यांची लक्ष्यलक्षणें महाराष्ट्र भाषेंत पद्यरूपानें सांगतों. गीति. छंदःशास्त्री जितकी छंदे वृत्ते॑ सुवर्णिली असती || तितकीं प्राकृत भाषेमध्ये कोणींहि घेतली नसती ॥ ३ ॥ प्राकृत कविनीं जीं जीं वृत्तें पाहोन घेतलीं गोडीं । तीं तींच वर्णितों मी येतिल बहुतेक राहतिल थोडीं ॥ ४ ॥ संस्कृत भाषेंत छंदांचे प्रकार बहुत आहेत; झणजे एक अक्षराचा पाद, दोन अक्षरांचा पाद, तीन अक्षरांचा पाद असे चढत चढत सव्वीस अक्षरांच्या पादापर्यंत छंद सांगितले आहेत; परंतु प्राकृत भाषेंत तितके प्रकार प्रसिद्ध नाहींत. एका अक्षरापासून सात अक्षरांपर्यंत चरणांचे छंद येथें घेतले नाहींत, आठ अक्षरांच्या चरणांपासून तेवीस अक्षरांच्या चरणांपर्यंत मात्र छंद येथें घेतले आहेत. गीति. मात्राक्षरसंघाच्या बोलति रचनेसि वृत्त की छंद | मात्राक्षरगणभेदीं होती त्यांचे अनेक ते भेद ॥ ५ ॥ १ रसिक जनाच्या हृदयास तृप्त करणारें २ संस्कृतांत 'दर्पण' हा शब्द पुल्लिंग असून एवं नपुंसक केला आहे. ३ महाराष्ट्र भाषेंत. ४ केवळ स्वर किंवा स व्यंजन स्वर. ५ उदाहरणें व लक्षणें. ६ गण.