Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. काव्याचा (पद्यरूप रचनेचा ) अभ्यास करणारे विद्यार्थ्यास, तिचे छंदाचे जे प्रकार आहेत, त्या प्रकारांचें व त्यांचे मेदांचें ज्ञान अवश्य असले पाहिजे. त्यांचें ज्ञान नसले तर, प्राचीन कवींच्या व अर्वाचीन कवींच्या कविता पाहण्यास किंवा नवीन कविता करण्यास मोठी अडचण पडते. कवितेचे प्रकार संस्कृत भाषेंत विद्वानांनी लिहून ठेविले आहेत; परंतु संस्कृत भाषा शिकल्यावांचून ते समजावयाचे नाहींत. तेच प्रकार प्राकृत कवींनी आपल्या कवितेंत घेतले आहेत; तरी संस्कृत ग्रंथांत जितके प्रकार सांगितले आहेत तितके त्यांनी घेतले नाहीत, असे त्यांचे ग्रंथ पाहिल्यावरून समजतें. ह्या विषयावर प्राकृत भाषेत झालेला ग्रंथ प्रसिद्धींत आला नाहीं. तो अवश्य असावा असें मनांत आणून विद्यार्थ्यांस वृत्तांची साधारण माहिती थोडक्यांत होण्याकरितां संस्कृत ग्रंथाच्या आधारानेच हा लहानसा पद्यात्मक प्राकृत ग्रंथ केला आहे. ह्यांत संस्कृतांतल्या- प्रमाणें वृत्तांचे सर्व प्रकार घेतले नाहीत. प्राचीन कवींचे बहुतेक पद्यात्मक ग्रंथ पाहून त्यांत वृत्तांचे व छंदांचे जे जे भिन्न भिन्न प्रकार आढळले त्यांचा मात्र येथें संग्रह केला आहे. ह्या लहानशा ग्रंथाचा जे कोणी लक्ष्य लावून अभ्यास करितील त्यांस वृत्तांविषयों बरीच माहितगारी होईल. किंबहुना पद्यरूप नवी कविता शुद्धरीतीनें करण्याची शक्ति येईल. हा ग्रंथ निर्दोष असेल असें ह्मणवत नाहीं; कोठें कोठें दोष रा हिले असतील; तथापि नवीन कृतीकडे लक्ष्य देऊन सज्जन क्षमा करितील असा भरंवसा आहे.