Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
वृत्तदर्पण.
उपसंहार.
श्लोक.
हैं वृत्तदर्पण अतज्ज्ञजनार्थ केलें ॥
सुज्ञांसमोर जरि धैर्य धरोनि नेलें ॥
ऐकोन हांसतिल रीति नवीच कानें ॥
हातीं तथापि धरितीलचि कौतुकानें ॥ १ ॥

येथें जें पडलें उणें अधिक तें विद्वज्जनीं साहिजे ॥ में पूर्ण कृपा करोनि बरवें केलें तिहीं पाहिजे || जे जे थोर परोपकाररत त्यां हैं योग्य आहे सदा ॥ त्यांचा तो उपकार फारच अह्मी मानूं सदा सर्वदा ॥ २ ॥ धुंडोनियां वृत्तसुधाकरातें ॥ जे लागले वृत्तमणी करातें || करोनि त्यांचीच सुवृत्तमाला || समर्पिली म्यां विबुधोत्तमाला || ३ || हा ग्रंथ गोडबोले उपनामक परशुरामतात्यानें ॥ केला वाचायाला ज्याच्या हृदयांत रसिकता त्यानें ॥ ४ ॥ सत्राशें व्यायशींच्या हा संपला रौद्रवत्सरीं || श्रावणाच्या कृष्णपक्षी दशमी भानुवासरीं ॥ ४ ॥

समाप्त.