वृत्तदर्पण. लघु असा असावा. त्यापुढे तीन गुरु, किंवा सहा लघु किंवा लघु गुरु मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसऱ्या भागांत पहिल्याप्रमाणे प्र- थम तीन मात्रांचा गण, मग पुन्हा तसाच आणखी तीन मात्रांचा गण, व त्यांच्या पुढे ह्मणजे शेवटी दोन गुरु असावे. ४० १ उदाहरण दिंडी. रघुनाथ पं०. कथा बोलूं हे, मधुर सुधावारा || होय शृंगारा, करुणरसा थारा ॥१॥ निपधराजा नळ, नामधेय होता || वीरसेनाचा, तनय महा होता ॥ २ ॥ २ उदाहरण दिंडी. रघु० पं०. चौगुणीनें जरि पूर्णशीतभानू || नळा ऐसा तरि कळानिधी मानू ॥ प्रतापाचा जो न मावळे भानू || तयासारीखा कोण दुजा वानूं ॥ २ ॥ ३ साकी छंद. प्रत्येक साकीला दोन चरण किंवा दोन अर्धे असतात; आणि दो- होंच्या शेवटीं यमक असतें. प्रत्येक अर्थात चार मात्रांचा एक गण असे सात गण ह्मणजे २८ अठ्ठावीस मात्रा असतात. चवथ्या गणा- च्या. अंतीं ह्मणजे सोळाव्या मात्रेवर अवसान असतें. पूर्वी मात्रावृत्तांत मात्रागण पांच प्रकारचे सांगितले आहेत, त्यांतून कोणतेही गण अ- सले तरी चिंता नाहीं; पण गण निरनिराळे मोजतां येतील असे अ- सावे आणि शेवटीं गुरु अक्षर यावें. उदाहरण. साक्या मोरोपंत. श्री रघुवंशी ब्रह्मप्रार्थित, लक्ष्मीपति अवतरला ॥ विश्वसहित ज्याच्या जनकत्वें, कौसल्याधव तरला ॥ १ ॥ राबवि सिद्धिसि आश्रामें जो तो, गाधिज मागुनि ने त्या || शिकवि वलातिवला विद्या शत, अस्त्रें विधिच्या नेत्या ॥ २ ॥ जनकमखातें मुनिसह जातां, प्रभुनें गौतमभार्या ।।
पान:वृत्तदर्पण.pdf/४०
Appearance