Jump to content

पान:वृत्तदर्पण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृत्तदर्पण. तून प्रसिद्ध ते प्रसंगवशात् येथें सांगतों; ते हे --- अभंग, दिंडी, सांको, ओवी, आणि घनाक्षरी. १ अभंग छंद. अभंग मुख्यत्वें दोन प्रकारचे आहेत. एक मोठा अभंग आणि एक लहान अभंग. त्यांत मोठ्या अभंगाचे दोन प्रकार आणि लहान अभंगाचे तीन प्रकार, असे सर्व मिळून अभंगाचे पांच प्रकार होतात. ते क्रमानें सांगतों. मोटा अभंग. मोठ्या अभंगास चार चरण असतात, त्यांत पहिल्या तीन चरणांस प्रत्येकी सहा सहा अक्षरें आणि चवथ्या चरणास चार अक्षरें असतात. पहिला प्रकार. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक असतें. उदाहरण. अभंग तुकारामाचे. काय वाणू आतां ॥ नपुरे ही वाणी || मस्तक चरणीं ॥ ठेवियेला ॥१॥ थोरीव सांडिली ॥ आपुली परिसें ॥ धन्य केलें कैसें || लोखंडासी ॥२॥ जगाच्या कल्याणा || संतांच्या विभूती ॥ देह कष्टविती उपकारें ॥ ३ ॥ भूताची दया हें ॥ भांडवल संतां ॥ आपुल्या ममता ॥ देहीं नाहीं ॥ ४ ॥ तुका ह्मणे सुख || पराचिया सुखें || अमृत हे मुखें ॥ स्रवतसे ॥ ५ ॥ दुसरा प्रकार. पहिल्या, दुसऱ्या, आणि तिसऱ्या चरणास यमक असतें. उदाहरण. अभंग तुकारामाचे. पंढरीस जावें ॥ जीवन्मुक्त व्हावें || केशवा भेटावें ॥ जीवलगा ॥ १ ॥ जन हे सुखाचे | दिल्या घेतल्याचे । बा अंतकाळींचें । नाहीं कोणी ॥ २ ॥ लहान अभंग. लहान अभंगास दोन चरण असतात. त्यांत प्रत्येक चरणास आठ आठ अक्षरें असतात. क्वचित् पहिल्या चरणास सहा अक्षरें, असतात. दोन्ही चरणांस यमक असतें.