३४ वृत्तदर्पण. ५९ दुसरी सवाई. य० ७, ६, ६, ४. कविजन त्या मदिरेसचि लक्षुनि ठेविति नाम सवाइ तिला || प्रथम नकार जकार सहा मग शेवा ते ल ग येति जिला | भरतिल तेविस अक्षर एकपदीं जरि मोजुनि पाहसि तीं ॥ प्रतिदिनं वाढतँ"से हिँ उँणावत" से विधु पक्षिति' असित" ॥ चरणांत अक्षरें २३. गण-न, ज, ज, ज, ज, ज, ज, ल, ग. उदाहरण. वा० मोरोपंत. शिवहृदयालये की सुखदायक निर्जरनायकसेव्यपदौ || अभय मला जरि देसि अपाय निवारूनि पाय नमीन सदा ॥ तुज भुजगाभभुजासि असे वर मागतसे वरदान करा ॥ रघुकुलवंशवतंस दशाननसंततिकाननदाहकरो || अर्धसमवृत्तें. ६० हरिणीकुता. U - विषम त्रिसकार ल गा असे ॥ न भ भ र क्रम हाच समी वसे ॥ विपॅम ॲकॅरा चॅरॅणीयुँता || द्विदश अक्षर ती हरिणीता ॥ चरण १, ३, अक्षरें ११. गण–स, स, स, ल, ग. चरण २, ४, अक्षरें १२. गण–न, भ, भ, र. उदाहरण वा० मजला गिरिराज कळीव या ॥ वनलतांत नकीं लपली प्रिया || कृश अंग तिचें अति निर्मळ || प्रिय निरंतर भाषण कोमळ || १ शुक्ल व कृष्ण पक्षांत. २ महादेवाचे अंतःकरणांत राहणा-या ३ इंद्रानें सेवा करण्यास योग्य आहे पद ज्याचें अशा. ४ सर्पासारखे ज्याचे बाहु आहेत अशा तुला. ५ रावणाच्या संततिरूप अरण्याचा दाह करणाया.
पान:वृत्तदर्पण.pdf/३४
Appearance