वृत्तदर्पण. जो वर्णे गगनोदरीं क्षण दिसे पूर्णेदु की शारदे || श्रीशांतःपुरचैत्वरींच उतरे तो सन्मुनी नारद || ५३ स्रग्धरा य० ७, ७, ७. कंठीं माळा घरी जी सुरुचिर तिजला स्रग्धरा नाम देतो || त्या वृत्तीं एकपादीं म र भ न य य या हे गण स्पष्ट येती || ज्याच्या प्रत्येक पादी भरतिल गणितां अक्षरें एकवीस || श्रीरामाचें स्वॅभन्नँ स्मरण मॅग कॅसे" होइँना ते॑ कॅबीस" ।। चरणांत अक्षरें २१. गण – म, र, भ, न, य, य, य. उदाहरण. वा० मोरोपंत. माझाँ प्रेमा सुदामा हरिसख दुबळा शब्दसंदोह जो है ॥ साधूंपाशी श्रुतीने पदर पसरुनी जोडिले स्वल्प पोहे | या दोनोपायनातें बुधजन भगवान् प्रीतिनें फार गोडी ॥
- आणोनी श्रोत्र भरिल बहु दया मानुनी तेहि थोडी ||
५४ अमृतध्वनि य० ४, ७, ७, ३. साराड मृतध्वनि उदारा नरा सुखवि दारा तिलाच ह्मणती ॥ ता भा य जा सरन गा हेच जेथ गण एकैक पादिं गणती || बेंबीस येति चरणीं अक्षरें गणुनि पाहींच संशय जरी ॥ रक्षाच्या" पॅरॅमभक्तासँ सर्केटिंच दैत्या बॅधी नरहरी ॥ चरणांत अक्षरें २२. गण- त, भ, य, ज, स, र, न, ग. उदाहरण. वा० आनंदतनय ३९ . माली करी हृदय भालासि तें भसिते ज्याला मृगार्जिन कटी || लोली जटा रुळति दोलापरी परम कोलाहलध्वनि उठी || हा लाभ मानुनिच नीलालका सुकृतशीला तयास नमिती ॥ आला मुनी निज घराला ह्मणुनि मग झाला पुढें नरपती || 13 १ शरहतूंतील २कृष्णाच्या जनानखान्यांचे अंगण्यांत ३ मोरोपंत कवीनें आपला. प्रेमा आणि सुदामा यांचे रूपक केले आहे. ४ समुदाय. ५ कानानें ६ गरीबाचे भे टोचे वस्तूस. ७ कर्णरूप मुखांत ८ जनकाच्या घरी विश्वामित्र गेला त्याचे वर्णन आहे. ९. भस्म. १० हरिणाचें कातडें. ११ चंचल. १२ झोपाळ्या सारख्या १३ काळ्या केसांच्या ( स्त्रिया ).