३० वृत्तदर्पण. उदाहरण. वा० उत्तररामच० ना०. हाही देवी हृदय फुटतें देह माझा गळाला || वाटे शून्य त्रिभुवन मला अंतरात्मा जळाला || या आत्म्यानें किति तरि सदा दुःखभारा धरावें ॥ मोह व्यापी फिरफिरुनि म्यां काय आतां करावें ॥ ५१ विबुधप्रिया. य० ३, ५, ५, ५. होतसे विबुधप्रियाव्य वृत्त तें बरवें तिथें || रास जा ज भ रा असे गण येति सा सरसे जिथें ॥ अक्षरें अठराच येतिल पादि मोजुनियां पहा || दीनंतारकं दुःखहारॅक शत्रुमारक राम हा ॥ चरणांत अक्षरें १८. गण - र, स, ज, ज, भ, र. उदाहरण. वा० रामचंद्र जोशी. राधिका सखि आज ती मज आणि भेटिस राजसे ॥ देतसें धन फारसें तत्र मानसा अवडे तसें || चित्त हें तिज पाहुनी भ्रमले दुजी न सुत्रे क्रिया ॥ प्राण जाइल वाटतो जरि येइना विबुधनिया || ५२ शार्दूलविक्रीडित. य० १२, ७. आहे वृत्त विशाल त्यास ह्मणती शार्दूलविक्रीडित ॥ मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित ॥ एकोणीस पहा गणूनि चरणीं येतात ही अक्षरें ॥ तेज:पुंज नभोऽगणी पसरली रत्ने पहा नक्षरे चरणांत अक्षरें १९. गण-म, स, ज, स, त, त, ग. २ ॥3 उदाहरण. वा० मोरोपंत. जो लोकत्रितयीं फिरे स्थिर नसे ताटीं जसा पार ॥ स्वांतध्येयपदींचं निश्चल भवांभोवत जो पार ॥ १ सीताविरहामुळे रामचंद्र शोक करतो. २ आकाशरूप अंगणांत ३ नक्षत्रें. ४ पारा. ५ परमेश्वरचरणीं ६ भवसमुद्रांत ७ पलीकडच्या तीरास लावणारा.
पान:वृत्तदर्पण.pdf/३०
Appearance