वृत्तदर्पण. उदाहरण. वा० मोरोपंत. सेवा करावया लावा देवा हा योग्य चाकर ॥ या तप्ताच्या शिरीं आत-पत्रे हो तुमचा कर || ६ मणिवंध. य० पा०. त्या मणिबंधातें धरिती ॥ या म स यत्पादा वरिती || अक्षरसंख्या यास नऊ ॥ सन्मने॑ लो॒ण्याहूनँ मॅऊँ ॥ चरणांत अक्षरें ९. गण-भ, म, स. उदाहरण वा०. द्रव्य मिळावे याकरितां ॥ कां हलक्यांना आर्जवतां ॥ काय नव्हे हो तो धनवान् || ईश रमेचा जो भगवान् ॥ ७ चंपकपाला. य० ५, ५. चंपकमाला तीस ह्मणावें ॥ भा म स गा ते जेथ गणावे || पांचदुणी पादाक्षर संख्या || शीघ्रं वराव सज्जनसख्य ॥ चरणांत अक्षरें १०. गण- भ, म, स, ग. उदाहरण. वा.. धांव मुकुंदा दुष्टविमर्दा || धांव रमेशा दुःखविनाशा | फार विपत्ती फारच भीती || यांस हरावें सत्वर यावें ॥ ८ हंसी. य० ४, ६. हंसी ऐसें ह्मणतिल तिथें ॥ येती पादी म भ न ग जिथें ॥ एक्या पादी अवयव दहा || मुक्तीमध्ये चिरसुख पहा ॥ चरणांत अक्षरें १०. गण - म, भ, न, ग. उदाहरण. वा. या संसारी चैलच सगळे | आप्त स्नेही तनुधनवळें ॥ विश्वस्त्रष्ट्याविरहित खरें || विश्वासाचें स्थळ न दुसरें ॥ १ उन्हापासून संरक्षण करणारें छत्र, म्हणजे छत्री. २ वा वृत्ताला 'मणिमध्य' असेंही नांव आहे. ३ पांचदुणी म्हणजे दहा. ४ अक्षरें. ५ चंचल. ६ जग उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरावांचून. .
पान:वृत्तदर्पण.pdf/१५
Appearance