१४ वृत्तदर्पण. २ माणवक. य० पा०. माणवक स्पष्ट ह्मणा ॥ भा त ल गा हेच गणा || अक्षरकें अष्टमितें || बॉलॅक तें दुग्धं पितें" ॥ चरणांत अक्षरें < गण - भ, त, ल, ग. उदाहरण वाहेरचें. नित्य नव्हे त्याकरितां ॥ कां झटतां कां श्रमतां ॥ जा भगवन्नाम वदा ॥ निर्भय गा त्यास सदा ॥ ३ प्रमाणिका. य० पा० प्रमाणिका तिला ह्मणा ॥ जरा लगा असें गणा || पदांत आठ अक्षर || वंदाल सत्य ते बरें" || चरणांत अक्षरें ८. गण - ज, र, ल, ग. उदाहरण वा०. 'अशाश्वतासि वंदितां ॥ व शाश्वतासि निंदितां ॥ असे स्वतांच वागतां ॥ ह्मणूनि ताप भोगितां || ४ समानिका. य० पा०. ती समानिका घडेल ॥ रा ज गा ल ज्या जडेल || पादि आठ् अक्षरेंच || सांगतो तुह्मां खरेंच ॥ चरणांत अक्षरें . गण – र, ज, ग, लं. उदाहरण स्वकृत. तूमचा मि दास सत्य ॥ जे कराल पारंपत्य || मान्य तें सुखास द्याल || योग्य तें तुली कराल | ५ अनुष्टुप् य० पा०. अनुष्टुप्छंद ते ज्याला ॥ एक नेम नसे गॅणीं ॥ अक्षरें चरणी आठ | देवा तार मला त्वरें" || चरणांत अक्षरें ८. गणाचा नियम नाहीं. १ हिला 'नगस्वरूपिणी' असेंही नांव आहे. २ अनुष्टुप् छंदास जरी गणांचा नियम नाहीं, तरी प्रतिचरणाचें पांचवें अक्षर लघु असावें, आणि समचरणाचें सातवें अक्षर लघु व विषमचरणाचें सातवें अक्षर गुरु असावें, इतका नियम आहे.
पान:वृत्तदर्पण.pdf/१४
Appearance