पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दरम्यान अचानक चंद्रम प्रकटतो. त्याचा समज असतो, की बायको मेलेली आहे; पण ती आपल्या मुलीसह प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करीत जगताना पाहन तो शरमिंदा होतो. पुढे लक्ष्मीची मुलगी चंद्रमच्या दत्तक मुलाच्या प्रेमात पडते. गावात वदंता असते की, हा मुलगा चंद्रमचाच आहे. बालमित्राच्या विधवा पत्नीस तो त्याच्यापासूनच झालेला आहे. अनौरस संततीस समाजमान्यता देण्याच्या सदाशयातून लिहिली गेलेली कथा ‘माझं बाळ' या खांडेकरांच्या मराठी चित्रपटाची आठवण करून देते. काही झालं तरी जगलंच पाहिजे,' अशी उभारी देणारी हा अनुबोधपट होय.
पटकथाकार खांडेकर
 वि. स. खांडेकर सन १९३६ ते १९६२ या सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात पटकथाकार, संवादलेखक आणि गीतकार म्हणून सक्रिय होते. या काळात मराठीत १४, हिंदीत १०, तर तेलगू-तमिळमध्ये प्रत्येकी २ अशा २८ चित्रपटांची निर्मिती झाली. 'छाया' (१९३६), 'ज्वाला' (१९३८), ‘देवता' (१९३९), ‘सुखाचा शोध' (१९३९), 'लग्न पाहावं करून (१९४०), 'अमृत' (१९४१), 'संगम' (१९४१), ‘सरकारी पाहुणे (१९४२), ‘तुझाच' (१९४२), ‘माझं बाळ' (१९४३), ‘सोनेरी सावली (१९५३), ‘अंतरीचा दिवा' (१९६०), माणसाला पंख असतात' (१९६१), ‘सूनबाई' (१९६२) (फक्त गाणी) हे मराठीत त्यांच्या पटकथा, संवाद, गीतांवर निघालेले बोलपट. त्यांच्या अनेक पूर्व कथा, कादंबऱ्यांच्या पटकथा झाल्या. काही त्यांनी चित्रपट व्यवसायाची गरज पाहून लिहिल्या. मूळ कथांत व्यावसायिक गरज म्हणून त्यांनी बदल केले, करून दिले. ‘छाया' (१९३६), ‘ज्वाला' (१९३८), 'मेरा हक' (१९३९), 'संगम' (१९४१), 'अमृत' (१९४१), ‘बड़ी माँ' (१९४५), ‘सुभद्रा' (१९४६), ‘मंदिर' (१९४८), ‘विश्वामित्र' (१९५२), ‘दानापानी' (१९५३) हे त्यांचे कालानुक्रमिक हिंदी चित्रपट. या चित्रपटांच्या मूळ कथा, संवाद, गीते वि. स. खांडेकरांची. त्यांचं हिंदी रूपांतर, अनुवाद पंडित इंद्र, अमृतलाल नागरांनी केलं. तेलगू व तमिळमध्ये त्यांचे प्रदर्शित बोलपट होते‘धर्मपत्नी' (१९४०), 'परदेसी' (१९५३). ‘धर्मपत्नी'चे रूपांतरण, संवाद चक्रपाणी यांनी केले होते.

 या साऱ्या पटकथांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य होते. अधिकांश पटकथा मूळ होत्या, तर एक-दोन आधारित. विषयांच्या अंगांनी अधिकांश कथा सामाजिक, काहीएक पौराणिकही. साऱ्या कथा माणुसकी, समता, समाजवाद, मूल्य महिमा, आदर्शवाद, बोध, ध्येय इत्यादींची जपणूक करणाऱ्या,त्यांच्या पटकथांमागे समाज बदलण्याचं ध्येय नि ध्यास होता.

वि. स. खांडेकर चरित्र/८९