पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मधील एक गाणे retake करण्याकरिता त्याला कंपनीकडून बोलावणे आल्याने हे काम रात्रीवर ढकलणे भाग पडले.
 पण या दोन दिवसांत आपणास याहूनही अधिक मध्यमवर्गाचे जीवनभागावर ज्यात मुख्यः करुणरसाला भरपूर वाव मिळेल, असा कथाभाग सुचविता आल्यास बरे होईल. तेव्हा त्या बाबतीत प्रयत्न करावा, असे मला वाटते, क. हे. वि.

आ. बाबूराव

 ता. क. : थोडक्यात असे म्हणू इच्छितो की, पिक्चर पाहून प्रेक्षक डोळे पुशीत बाहेर पडले पाहिजेत व ती उदासीनता घरी जाईपर्यंत स्थिर राहिली पाहिजे.
 या पत्रावरून 'हंस'ची चित्रपटनिर्मितीमागील ध्येयवादी भूमिका पुरेशी लक्षात येते. हे पत्र नि मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, प्रभृतींमधील चर्चेनुसार मग ‘उल्का’, ‘दोन ध्रुव', 'दोन मने'च्या मनोभूमिकेच्या ‘छाया बोलपटाची कथा तयार झाली. ही पहिली पटकथा व तिचे संवादलेखन वि. स. खांडेकरांनी मास्टर विनायक व र. शं. जुन्नरकर यांच्या मदतीने पूर्ण केले. जानेवारी, १९३६ च्या पहिल्या तीन आठवड्यांत हे लेखन डॉ. भडकमकर यांच्या पुण्यातील बंगल्याच्या तिस-या मजल्यावर करण्यात आले.४६

 'छाया'बोलपटाचा मुहूर्त ५ मार्च, १९३६ रोजी पुण्याच्या सरस्वती सिनेटोनमध्ये करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानप्रकाश'चे संपादक काकासाहेब लिमये, आचार्य अत्रे, कवी गिरीश, राजकवी यशवंत, माधव ज्यूलियन, तळवलकर, प्रभृती साहित्यिक व पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.चिन्मुळगुंद सपत्निक उपस्थित होते. तीन महिन्यांत या बोलपटाचे चित्रीकरण पूर्ण करून तो २० जून, १९३६ रोजी मुंबईच्या मॅजिस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. सुरुवातीच्या खेळात अन्य मान्यवरांबरोबर 'महाराष्ट्र शारदा'चे श्री. रा. टिकेकर उपस्थित होते. 'छाया' प्रदर्शित झाल्यावर बाबूराव पेंढारकरांनी खांडेकरांना दि. २५ जून, १९३६ रोजीच्या पत्रावर लिहिले होते की, ... सर्व वर्गाला स्टोरी, Treatment, acting and songs फारच आवडले. End खेरीज कसलाच दोष कोणीही काढीत नाही.' बद्दलसुद्धा वरच्या क्लासला हा End फारच आवडला. काही वर्गाला मात्र मुलाचे काय झाले ते थोडे दाखवावे असे वाटते. यामागे ‘छाया'च्या कथानकाचा संदर्भ आहे. 'छाया'ची कथा ही सामाजिक समस्येवर आधारित आहे. एकीकडे जिवाभावाची नाती जपण्याची अगतिकता, तर

वि. स. खांडेकर चरित्र/६४