पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिवस, ती माणसे', 'रेषा आणि रंग','रंग आणि गंध'मध्ये केला आहे. याशिवाय पन्नासएक असंकलित व्यक्तिपर लेख माझ्या संग्रही आहेत. त्यांतील निम्मे व्यक्तिपरिचयपर असून उर्वरित कार्य, साहित्यसमीक्षापर आहेत. लवकरच त्यांनाही ग्रंथरूप देण्याची योजना आहे. अशा लेखांत जीवनपट, व्यक्तिस्वभाव, लकबी, व्यक्तिमत्त्व, विचारकार्य, साहित्य अधोरेखित करून खांडेकरांनी चरित्रनायकाचे योगदान स्पष्ट केले आहे. अशा लेखांत संत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कवी, कलाकार, राज्यकर्ते, समाजसेवक इत्यादींचा समावेश आहे. असे लेख ते १९७५ पर्यंत लिहीत राहिले. अशा व्यक्तींपैकी काहींच्या आठवणी पण खांडेकरांनी शब्दबद्ध केल्या आहेत.उदा.राम गणेश गडकरी.
 गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य, कर्तृत्व व विचारांचा खोल असा प्रभाव खांडेकरांवर होता. तो व्यक्त करण्यासाठी सन १९३२ मध्ये आगरकर चरित्र लिहिले. असे संपूर्ण चरित्र जरी नसले तरी एका व्यक्तीवर अनेक लेख लिहन खांडेकरांनी त्यांच्या जीवन व विचारांविषयीची आपली असीम आस्था नि आदर व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींत नाटककार खाडिलकर, कोल्हटकर, देवल, केळकर यांचा समावेश होतो. पैकी कोल्हटकरांविषयीचा आदर त्यांनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत (१९७२) 'निवडक कोल्हटकर', ‘समग्र कोल्हटकर' (भाग १ व २) ग्रंथ सिद्ध करून व्यक्त केला आहे. तत्पूर्वीही खांडेकरांनी सन १९३२ मध्ये कोल्हटकर लेखसंग्रह'चे संपादन केले होते. असेच पुस्तक नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांवर संपादित करणे शक्य आहे. महात्मा गांधी (जन्मशताब्दी वर्षात (१९६९) लिहिलेल्या लेखांचे पुस्तक नुकतेच मी वानगीदाखल संपादित केले असून जाणकारांनी त्याचे स्वागत केले आहे.

 याशिवाय मराठी साहित्याच्या व्यक्ती आणि वाङ्मय'स्वरूपाचं चरित्र व समीक्षांचे संपादन आणि लेखन ही खांडेकरांनी मराठीला दिलेली अमोघ देणगी होय.‘गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय' (१९३२), ‘वा. म. जोशी : व्यक्ती आणि विचार' (१९४८), ‘आगरकर : व्यक्ती आणि विचार' (१९४९), 'केशवसुत : काव्य आणि कला' (१९५६) सारख्या साहित्यकृती या संदर्भात लक्षात घेण्यासारख्या आहेत. वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील एकमेवाद्वितीय असे व्यक्ती होत की, ज्यांनी दुसऱ्या साहित्यिकांची मनस्वी भलावण केली. आपल्या स्वागतशील स्वभाव वृत्तीचा खांडेकरांनी पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज, रणजित देसाई, मंगेश पाडगावकर, प्रभृतींना आपल्या विविध कृतींतून करून दिलेला परिचय

वि.स.खांडेकर चरित्र/५२