पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९३५ : पुणे येथील शारदोपासक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन चौथे)
१९३६ : ‘हंस पिक्चर्स'साठी पहिला बोलपट लिहिला. 'छाया'.
१९३६-६२ : या सव्वीस वर्षांत‘छाया',‘ज्वाला','देवताअमृत'
 आणि ‘माझं बाळ' यासारख्या २८ चित्रपटांसाठी कथा लिहिल्या.
१९३६ : सोलापूर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (अधिवेशन
 पहिले)
१९३६ : ‘ज्योत्स्ना' मासिकाचे संपादन.
१९३६ : ‘ज्योत्स्ना' मासिकात ‘साहित्यिकांचे हितगुज' हे सदर
 सुरू केले.
१९३६ : मे महिन्यात ‘ज्योत्स्ना' मासिकाचा पहिला अंक भाऊसाहेब
 आणि दौंडकर यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध.
१९३६ : 'छाया'च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटकथेबद्दल भाऊसाहेबांना'गोहर'
 सुवर्णपदक मिळाले.
१९३९ : उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष.
१९४१ : जमखंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 (अधिवेशन दुसरे)
१९४१ : सोलापूरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.
१९४१ : ‘कलिका' हा पहिला रूपककथासंग्रह प्रसिद्ध.
१९४६ : मिरज येथील दक्षिणी संस्थान पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष.
१९४७ : बडोदे येथील मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष.
१९४९ : इंदूर येथील शारदोत्सव, महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष.
१९५५ : मुंबई व उपनगर साहित्य संमेलन, डोंबिवलीचे अध्यक्ष.
१९५७ : सातारा येथील मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष. (अधिवेशन  चौथे)
१९५८ : सौ. उषाताईंचे (पत्नी) निधन. २६ ऑक्टोबर
१९५९ : मिरज येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

 (अधिवेशन एकेचाळिसावे)

वि. स. खांडेकर चरित्र/१६५