पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१ सचित्र चरित्रपट, १ चरित्रग्रंथ असे २५ ग्रंथ प्रकाशित झालेत अन् त्यांच्याही आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. अजून १ विनोदी लेखसंग्रह, १ भाषणसंग्रह, २ समीक्षा ग्रंथ, २ वृत्तपत्रीय लेखनसंग्रह, २ अपूर्ण कादंबऱ्या, १ निवडक प्रस्तावना संग्रह, १ परीक्षण संग्रह, १ स्मारकग्रंथ असे डझनभर ग्रंथ संपादित झाले असून ते प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि नवा वाचक त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

 वि. स. खांडेकरांच्या साहित्यात अशी कोणती गोष्ट आहे की जिने कालच्या वाचकांना रिझवलं; आजच्या वाचकांना ते वाचणं आवश्यक वाटतं आणि कदाचित उद्याच्या वाचकांचंही ते आकर्षण असेल? वि. स. खांडेकरांच्या साहित्यपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वेगळं ठरतं. खांडेकरांच्या लेखनाचं आपलं असं वेगळेपण आहे. वाचक ते वाचतो, तेव्हा आपला एक वडील माणूस जवळ बसवून चार हिताच्या गोष्टी ऐकवितो असा विश्वास ते निर्माण करतं. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी ते सुसंस्कृत, सभ्य वाटत राहतं. उदाहरणच सांगायचं झालं तर खांडेकरांच्या कादंबऱ्यांत प्रेम असतं; पण त्यात कामुकता नसते. ते वाचीत असताना विचक्षणपणे लक्षात येतं की, अरे हे खांडेकरांचंच असलं पाहिजे. विशेषतः त्यातलं भाषासौंदर्य! विजेची चमक दाखविणाऱ्या कल्पना कराव्या उपमा द्याव्यात, सुभाषितवजा वाक्यांची फेक असावी ती खांडेकरांची! काही लोक त्याला कृत्रिम म्हणतात; पण कला नि कृत्रिमता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ‘भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आला नाही, तर त्याला भविष्याच्या गरुडपंखांचे वरदानही लाभले आहे. अशी वाक्ये वाचकांना एकाच वेळी त्यातील सौंदर्याने दिग्भ्रमित करतात आणि दुसरीकडे जगण्यावरील श्रद्धा वाढवित सामान्य, हताश वाचकांना जगण्याची उमेदही देतात. खांडेकरांच्या साहित्याचं खरं बलस्थान त्यांचं मूल्यशिक्षण होय. सदाचार, नैतिकता, अहिंसा, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, पुरोगामीपणा या अशा गोष्टी आहेत की ज्यांचे महत्त्व केवळ कालातीत म्हणावं लागेल. ‘लास्टिंग ह्युमन व्हॅल्यू' कोण नाकारेल? शिवाय खांडेकरांचं लेखन, जीवन म्हणजे विचार आणि कृतींचं अद्वैत. ते महर्षी धोंडो केशव कर्वेवर गौरवलेख, चित्रपट (माझं बाळ) कथा लिहून ते थांबत नाहीत. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था, पंढरपूरचा अनाथाश्रम यांना नियमित भाऊबीज पाठवित. बाबा आमटेंना स्वतः भेटायला जाऊन नम्रतेने नमस्कार करणारे आणि नंतर त्यांच्या “ज्वाला आणि फुले' काव्यसंग्रहास स्वतः प्रस्तावना लिहिणारे खांडेकर

वि. स. खांडेकर चरित्र/१४३