पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खांडेकरांच्या लघुनिबंधात असते; पण पाल्हाळिकतेचा दोषही त्यांत कधी आढळतो. बहारीचा आरंभ, वैचित्र्यपूर्ण विकास, तात्त्विक वा निष्कर्षवजा शेवट अशी विभागणी घेऊन येणारे हे लघुनिबंध वाचक व लेखकांत एक हितगुज निर्माण करतात. वाचकांना ते खिळवतात. सहज मोठं जीवनसत्य सांगतात. रंजक पण त्याच वेळी विचारोत्तेजक असणारे हे निबंध वाचकाला प्रत्येक वेळी नवं स्वप्न देत नव्या सत्याकडे नेतात. ‘चरमसत्याचा आविष्कार (Eternal Expression) या कसोटीवरही हे लघुनिबंध कालत्रयी (Classics) ठरतात.

 आत्मकथनात्मक लेखनही ललित साहित्यच असते. एका पानाची कहाणी' हे खांडेकरांच्या जीवनाचा पूर्वार्धच व्यक्त करतं; पण वेळोवेळी खांडेकरांचे अनेक आत्मपर लेख, मुलाखती, भाषणे असे विविधांगी साहित्य उपलब्ध आहे; पण ग्रंथरूप नाही. पैकी पहिली पावलं' हे त्याचे मराठीतील पहिले साहित्यिक आत्मकथन मानावे लागेल. 'वैखरी' मासिकातून त्यांनी ‘पहिली पावलं' सदर लिहिले. त्यातून त्यांनी कथा, कादंबरी, रूपककथा, पटकथा, लघुनिबंध, समीक्षा, भाषांतर, नाटक, वक्तृत्व, संपादन असे बारा लेख लिहिले. ते 'वैखरी'शिवायही अन्यत्र प्रसंगोपात लिहिलेत. (हंस, वसंत, ललित इत्यादी) अशा लेखांचा गुच्छ म्हणजे ‘पहिली पावलं (२००७). सन १९८८ मध्ये विजय तेंडुलकरांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. साहित्यातून सत्याकडे'. त्याची एक सचित्र जाहिरात 'ललित'च्या रौप्यमहोत्सवी अंकात (ऑगस्ट, १९८८) मध्ये पाहावयास मिळते. त्यात तेंडूलकरांच्या छायाचित्राखाली त्यांचेच एक वाक्य आहे - 'हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे माझे आत्मवृत्तच आहे... याशिवाय खांडेकरांच्या आणखी एक अचर्चित आत्मकथनपर लेखसंग्रह प्रकाशित आहे. ‘सशाचे सिंहावलोकन' (२००७) असे त्याचे शीर्षक, या शीर्षकातच उत्कट लालित्य, प्रतीकात्मकता, मिथक भरलेले आहे. (आचार्य अत्रेच्या नेहरूंवरील ‘सूर्यास्त' पुस्तक शीर्षकासारखीच ही सूचकताही! यात खांडेकरांनी लिहिलेल्या जीवन व लेखनविषयक आत्मपर लेखांतून आजवर न उलगडले गेलेले उमगते. या दोन्ही आत्मकथनांतील लेखशीर्षके ‘मी वाङ्मयाकडे का आकर्षित झालो?', 'मी लेखक कसा झालो?', 'माझ्या आयुष्याचा माझ्या लेखनावर परिणाम', 'माझ्या आयुष्यावर परिणाम करणारे ग्रंथ', 'मी लेखनाकडे कसा वळलो ?' 'माझ्या जीवननिष्ठा' अशी अनुक्रमणिका वाचत वाचीक ही पुस्तके केव्हा वाचू लागतो हे त्याचे त्यालाच कळत नाही. लेखक/कवी असतो कसा आननि?' अशी जिज्ञासा चाळवणारी

वि. स. खांडेकर चरित्र/१३१