पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातूनच ‘रायटर्स अॅट वर्क’, ‘इब्सेन्स वर्कशॉप', चेकॉव्हची पत्रे' अशी पुस्तके जन्माला येत असतात. जी. ए. कुलकर्णी त्यांच्या साहित्य समीक्षेपेक्षा ‘जी. एं.ची निवडक पत्रे' (भाग १, २, ३, ४), ‘प्रिय जी. ए.',"जी. एं.ची पत्रवेळा' मधून अधिक समजत. त्यांच्या साहित्याच्या लालित्याचे रहस्य उमजते, समजते ते अशा ग्रंथांतून. तीच गोष्ट प्रा. नरहर कुरुंदकरांची. ‘निवडक पत्रे (जया दड़कर) मधून त्यांच्या साहित्याचे ललितपण समजायला मदत होते. रायटर्स अॅट वर्क' मालिकेतील मराठी पुस्तके म्हणजे प्रभाकर अत्रेचे ‘कथा सृजनाची' आणि मो. ग. रांगणेकर संपादित 'मी आणि माझे लेखन'. एका पिढीचे आत्मकथन', ‘दुस-या पिढीचे आत्मकथन' मधूनही बहुचर्चित मराठी साहित्यिकांच्या साहित्यातील ललित तत्त्व उलगडते; पण मुळातून ‘ललित साहित्याचे स्वरूप समजून घ्यायला, त्याची सैद्धान्तिक बैठक कळायची तर प्रा. ना. सी. फडके यांचे प्रतिभा साधन’, ‘प्रा. बा. सी. मढेकरांचं ‘वाङ्मयीन महात्मता', प्रा. रा. ग. जाधवांचे वाङ्मयीन निबंध' आणि डॉ. वा. के. लेलेंचे ‘ललित लेखन व शैली'सारखी पुस्तके अभ्यासल्याशिवाय 'ललित' संकल्पना स्पष्ट होत नाही.
 साहित्याची समीक्षा करीत असताना ती दोन अंगांनी केली जाते (१) आशयानुवर्ती (२) अभिव्यक्ती चिकित्सा. सर्वसाधारण समीक्षकांचा कल आशयकेंद्री समीक्षेकडे राहतो कारण अशी परीक्षणं, समीक्षा करणे म्हणजे परिचय देणे असते. अभिव्यक्तीच्या अंगाने होणारी समीक्षा एक तर सैद्धान्तिक बैठकीवर आधारित असते; शिवाय ती कलात्मकही असते. विश्लेषण तिचा आधार असतो. ती वर्णनापेक्षा उदाहरण, दृष्टान्तकेंद्री या अर्थांनी सूक्ष्म असते. वृत्तपत्रीय चौकटीत कलात्मक समीक्षेस कमी वाव राहत असल्याने समीक्षात्मक, संशोधनात्मक ग्रंथच अशा समीक्षेस पैस उपलब्ध करून देत असतात. वि. स. खांडेकरांच्या वरील नवसंपादित ग्रंथांतून समोर येणारे ललित साहित्य, त्याचे लालित्य पाहायचे झाले तर ते सैद्धान्तिक आधारांवर, निकषांवर करणेच श्रेयस्कर.

 मराठीत आपण 'ललित साहित्य' किंवा 'साहित्याचे लालित्य' म्हणतो तेव्हा त्याचे ‘ललितत्व' पाहणे, अभ्यासणे अपेक्षित असते. स्थूलरूपाने प्रतिभेने निर्मित साहित्य आपण 'ललित' मानतो. इंग्रजीत त्याला 'Graceful Literature' म्हणून संबोधले जाते. इंग्रजीत Grace शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना मार्मिकतेने म्हटले गेले आहे की, 'Grace is a beauty being the outward but the sign of inward.' त्या अंतःसौंदर्यामुळेच ललित साहित्य सुंदर, आल्हाददायक, आकर्षक असते. मराठीत 'ललित' म्हणविणाऱ्या

वि. स. खांडेकर चरित्र/१२६