पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खांडेकर वाचून तुम्ही विसरू शकत नाही. कलात्मकता व तत्त्वचिंतकता यांचं अद्वैत घेऊन जाणारं खांडेकरी साहित्य वाचकांच्या मनात विचारांचा भुंगा लावतं. ते त्याला पोखरतं, प्रेरित करीत कधीतरी कृतिप्रवणही करतं. तेच त्यांच्या साहित्याचं श्रेय आहे आणि प्रेयही!

वि. स. खांडेकर चरित्र/१०२