पान:विवेकानंद.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


योद्धथानें समोरच्यापैकीं जो आपल्याच सारख्या हत्यारांनी युक्त असेल त्या बरोबरच युद्ध करावें असा नियम होता. घोडेस्वारानें घोडेस्वाराबरोबरच युद्ध करावें. रथ्यानें रथ्याबरोबरच लढावें असा नियम असे. तसेंच हत्यारांना विष लावण्याची मनाई असे. शत्रु निजला असतां अथवा गैरसावध असतां त्यावर हल्ला करावयाचा नाहीं आणि त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या कपटानें युद्ध करावयाचें नाहीं असाही नियम असे. अशाच प्रकारचे दुसरेही कित्येक नियम होते. यांपैकी एखादा नियम कोणी मोडला तर तें त्याच्या क्षत्रियत्वाला लांछनास्पद समजले जात असे. सर्व क्षत्रियांना अशा प्रकारचें शिक्षण दिले जात असे. मध्यआशियांतून परदेशीयांच्या स्वाच्या हिंदूवर झाल्या, तेव्हां त्यांनी आपल्या या नव्या शत्रूंशीं युद्ध करतांनाही हेच नियम पाळले होते. शत्रूचा पराभव होऊन तो परत जात असतां त्याची रवानगी करून देतांना त्यास नजरनजराणा द्यावयाचा असें कित्येक वेळां घडलें आहे. कोणत्याही परकीय राज्यावर निष्कारण स्वारी करून तो देश बळकवावयाचा नाहीं अशी त्या वेळीं आर्यनीति होती. शत्रूचा एखादा मोठा मनुष्य आपल्या हातीं सांप- डला तर त्याच्या इतमामाप्रमाणे त्याची रवानगी आर्यराजे करीत असत. मुसलमानांची स्वारी आल्यानंतर या सर्व गोष्टी बंद झाल्या. एखादा हिंदुराजा हातीं सांपडला असतां मुसलमानांनीं त्यास जिवंतही सोडलें नाहीं असें कित्येक वेळां घडले आहे.
 महाभारतीय युद्धाच्या काळी केवळ धनुष्यबाण एवढेच हत्यार नव्हतें हैं लक्ष्यांत ठेवण्याजोगे आहे. शस्त्रांबरोबरच अस्त्रांचाही उपयोग त्यावेळी केला जात असे. अत्रें म्हणजे मंत्रयुक्त अर्शी गुप्त शस्त्रेंच होत. मंत्रांचा उपयोग युद्धाच्या कामी पुष्कळ होत असे. मंत्राच्या सामर्थ्यांनें एकटा मनुष्य लाखों लोकांबरोबर युद्ध करीत असे. अग्न्य च्या प्रयोगानें लक्षावधि लोक जळून जातील असा अग्नि एकटा मनुष्य पेटवूं शकत असे. पर्जन्यास्त्रानें मंत्रित केलेला एक बाण कोणी फेंकल्याबरोबर मुसळधार पाऊस पडत असे. त्या अस्त्रविद्येच्या वेळींही तोफांचा उपयोग युद्धांत करीत असत, हें विशेषेकरून ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. तोफ हें अत्यंत जुनाट हत्यार आहे असे उघड दिसतें. चिनी लोकही पुरातनकाळी या हत्याराचा उपयोग करीत असत. चिनी शहरांच्या भोंवतालच्या भिंतींवरून कित्येक तोफा चढवून ठेवलेल्या