पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विणकऱ्याचा मार्गदर्शक.
प्रकरण १ लें.
गिरणीतील कापडापेक्षां हातमागावरील
कापड जास्त टिकाऊ कां?

 हे पुस्तक लिहिण्यापूर्वी वाफेने चालणा-या मागावरील कापडापेक्षां हातानें चालविलेल्या व म्हणूनच फार मेहनतीनें तयार केलेल्या मागावरील महाग कापडामध्यें विशेष गुण काय आहे हें सांगणें जरूर आहे. सूत कातून तयार झाल्यानंतर त्याचे कापड तयार करण्याकरितां तें मागावर येईपर्यंत त्या सुतावर गिरणीमध्यें दोन तीन प्रयोग करावे लागतात व ते करतांना गिरणीच्या कृतीमुळे सूत निर्जीव होतें.
 (१) विणतांना सूत तुटण्याचा संभव फार म्हणून तें मजबूत करण्याकरितां त्यास खळ द्यावी लागते. गिरणीमध्यें सुतास जी खळ लावतात त्या खळीमध्यें कापड तयार झाल्यावर त्या कापडास कसर लागूं नये म्हणून त्यांच्या खळींत प्राणिनाशक द्रव्यें घातलेलीं असतात. त्या विषारी द्रव्यांचा परिणाम सुतावरील बारीक तंतूंवर होऊन त्यानें कापड कमकुवत होतें. हात मागवाल्यांच्या खळींत