पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

रेल्वेच्या डब्यातील आत्मा



 मी जयपूरला निघालेली.
 आपल्याकडे एकटी दुकटी बाई प्रवासाला निघाली की अवघे घर बेचैन होते. त्यातून मी दोन प्रांत ...गुजरात, मध्यप्रदेश ओलांडून अगदी पंजाबच्या जवळ जाणार होते. मग काय विचारता सगळे घर हैराण . माझ्या मुलांना आईच्या हिंदी आणि इंग्रजीची चिंता . मुलगी शिकवू लागली , "अम्मा , तू त्या दिवशी गुरख्याशी कसलं भयाण हिंदी मारत होतीस ! वो भिंतीके पलीकडे डुकरीण और उसकी पिलावळ है. उसको हुसको ... मला एवढं हसू येत होतं."
 नवऱ्याला वेगळीच काळजी लागली होती . अलिकडे बायकोचे पाय दुखतात , गुडघा दुखतो म्हणते. त्यात शारीरिक समृद्धी वाढत चाललेली . तरं, त्यांचे तीनतीनदा बजावणे सुरू होते. ही डायरी, तिच्यात पूर्ण नाव , पत्ता, फोन नंबर सगळं लिहलंय. तुझा व्लडग्रुपही लिहून टाक आणि ही औषधं . ती नीट ठेव आठवणीने . वी कॉम्प्लेक्स घे.. आणि हे बघ ज्या क्षणी वाटेल की परत फिरावं त्या क्षणी परतीच्या प्रवासाला लाग.".
 आणि मी?
 स्त्री-स्वातंत्र्य झिंदाबाद ! स्त्रीपुरुष समानता झिंदावाद ! समानसंधी झिंदाबाद!!! वगैरेंच्या घोळक्यातं.
 ऐनवेळी मन जरा विरघळलेच ! पण जयपूरचा गुलावी रंग , आमेरचा किल्ला नि नक्षीदार हवामहल मनाला खुणावीत होते . मग नकाशा शोधून त्यावर जयपूर शोधणे सुरू झाले. ते बेटे निघाले थेट औरंगाबादच्या डोक्यावर . जयपूरच्या ठिपक्यावर हात ठेवताना वाटत होते , जणू मी जवपूरच्या हवामहलच्या शिखरावरच उभी आहे . पण औरंगाबाद आणि जयपूर यात सहाशे किलोमीटर्सचे अंतर होते.
 औरंगाबाद ते इंदूरच्या बसमध्ये बसले . बस सुरू झाली आणि एकाएकी खूप एकटेपणा आला . मनात कल्पनाही आली .अनोळखी माणसांनी गजबजलेल्या इंदूरच्या रेल्वे स्टेशनात मी उभी आहे आणि छातीत चक्क कळ येतेय. चेहरा घामाने डवरलाय... वगैरे. मग शवनम वॅगेतली डायरी चाचपून पहाणे, हे सारे एका

॥ ३०॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....