पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

 "ती घरची कामं करी. कोणची वरं?" मी.
 "सकाळी उठून अंगण झाडायचं.
 भाकरी करायच्या.
 धुण-घेऊन नदीला न्यायाचं.
 माई बरुबर न्हानग्याला घिऊन रानाला जायचं ...
 सकाळी शेताला जायांच.
 सांजच्याला सरपन
 बाभळी साळून आनायच्या.... मुली
 "तर ही मुलगी. तिचं नाव आपण सरू ठेवू या, ती सगळी काम करायची सकाळी उठून माय चा करी. सरूला नि तिच्या वडिलांनी देई
 तिच्या भाऊला माझं वाक्य संपायच्या आत सामूहिक उत्तर
 दुदू मिळे
 "दुधात पानी घालू ना?" मी
 "व्हय." मुली.
 "दुधात पाणी घातलं नाय तर म्हशीला दीठ व्हती. तिचं दुदू आटतं." एक धिटुकली उभी राहात मला कारण सांगते.
 भाऊला दूध नि सरुला चहा. आईचा सरुला राग येत असेल का गं?" माझा प्रश्न.
 "न्हाई SS" सामूहिक उत्तर
 "का गं?" पुन्हा माझा प्रश्न.
 "पुरसांची गोष्ट वेगळी असती... बायांच काय! भाऊ वंसाचा दिवा लावतो. म्हातारपणी मायवापाला सांबाळतो. तेची ताकद आताच वाढायला हवी.... उत्तरे
 "सरूला पण तसंच वाटायचं? की बाई बिनकामाची आणि बिनमहत्त्वाची असते म्हणून" - मी
 "न्हाई" पुन्हा कोरस
 "मग तिला काय वाटायचा माझा प्रश्न"
 "बाई घरात नसल तर घरची कामं कोन करील ?
अन्न कोन शिजवील?
लेकराला जलम कोन देईल?
बाई बी महत्त्वाची असती, पन पुरसापरीस कमी!" मुली.
 "तर सरूला वाटायच आपण खूप शिकावं, चार पैसे कमवावे, चित्रांची पुस्तकं वाचावी, निळ्या रंगाची फ्रॉक घालून शाळेत जावं, गाणं म्हणावं, उड्या माराव्या, शिवणापाणी खेळाव, भाषणं द्यावीत, मोठं होऊन इंग्रजी शिकावं डॉक्टर व्हावं,

॥२८॥ वाहत्या वाऱ्यासंगे