पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

 "माय म्हंती शिकून चुलीम्होरच बसायचं . शिकून काय मिळणार आहे ? माय म्हंती की तू शाळेत गेल्यावर न्हानग्याला कोन पाहील ? तिला शेतकाम कराया जावं लागतं"
 दुसरी सांगतेः खेड्यातल्या सहासात वर्षांच्या मुलीला झाडझूड भाकरी करणे . धुणं धुणे ही कामे करावीच लागतात .
 आम्ही गप्पा मारीत असतानाच गावातल्या आजीवाई आल्या. त्या सांगू लागल्या . "ताई , या पोरी नसीबवान हाईत. आमच्या येळला चारपाच वरसाच्या पोरीचं लगीन होई . नि तिला सासूच्या घरी नांदावं लागे . चला मी तुमाला पाणवठा दावते . हा समुरचा डोंगर उतरून खाली निळामाईच्या डव्हाचं पाणी आनावं लागे. खडा डोंगर भरली घागर घेऊन चढताना तेराचवदा वर्पांच्या पोरीचा जीव , तिच्या कवळ्या छातीत मावत नसे . चार ठिकाणी घागर भुईला ठेवावी लागे. नव्यानं नांदाया आलेल्या पोरीला पाणी भरता भरता नाकी नवं येत. दरसाली निळाईचा ढव दोनतीन पोरींचा वळी घेई . गावची माणसं म्हणत तिथ आसरा हाईत . त्यांना कवा या पोरी खायला लागतात. उगा वोलायची रीत व्हती! खरं तर पान्यापायी पोरी ढवात जीव बुडवून गार होत!
 "आता बरं हाय हापसा आलाया. हीर झाली . साळा आली पन साळंत एकदोन शिकून पोरींना कामधंदा थोडाच येणार हाय? सडासारवण, भिंती हुव्या लिंपायच्या चूल कोरायची, निंदणं खुरपणं करायचं... ही असली कामं जलमभर करावी लागतात. तिथं असल्या एकदोनचा काय उपेग? ताई तुम्ही वायांना परपंचाचं शिक्षण देणारी साळा काढा, मग आमी वी येऊ शिकायला." आजीवाई दाईकाम करतात त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले आहे. त्यांची नात शहरांत शिकायला ठेवली आहे:
 "आजी , तुम्ही वरी नातीला शाळेत धाडलीत? तीही शहरात शिकायला ठेवलीत?" मी विचारले.
 "शिक्षण वाया जात नाही हे मला वी कळत. शिकली तर नवराबी शिकलेला मिळंल . नवऱ्यानं पीठ आनलं तर वाईन त्यात चिमूटभर मीठ घालावं म्हंजी भाकर चवदार व्हती." आजीबाईंनी उत्तर दिले .

܀ ܀ ܀
चार

 आम्ही नववीत होतो तेव्हाची गोष्ट श्रावणातले हिरवेगार दिवस. गरुडबागेतल्या प्रचंड बकुळवृक्षाखालची फुले मधल्या सुट्टीत वेचून आणण्यासाठी आम्ही डव्यातली पोळी अक्षरशः तोंडात कोंबून फाटकावाहेर पळत असू. अजूनही त्या डव्याला वकुळीचा आर्त कोमल गंध येत असेल ! धाप लागेस्तो पळत पळत शाळेत पोचायचो. नेमकी घंटा होऊन जोशी बाई वर्गात आलेल्या असायच्या. बाई वरुन नारळासारख्या

॥ २४॥ वाहत्या वाऱ्यासंगे