पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

वस्त्या यांतील मुलींच्या नि त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत , सर्वच म्हणतात की मुलीला शिकवून काय फायदा? त्या तर परक्याच्या घरी जाणार . शिवाय हुंडा द्यावा लागणार . मला पण हुंडा द्यावा लागेल पपा ? मोनाचा प्रश्न .
 "तू आधी शिक. आणि मग तूच ठरवायचंस, तूच म्हणालीस तर द्यावा लागेल !" पपा हसत म्हणतात . पण हसताना त्यांचेही डोळे पाणावतात .
 मोना पपांचा हात धरून म्हणते, "पपा, ती फिल्म पाहताना वाटलं की मी खूप खूप नशिबवान आहे . कारण मला असे प्रश्न कधी पडलेच नाहीत. बेकबेच्या पाढयासारखी मी पुढे पुढे सरकतेय . पण आज नकुशा पाहून मन खूप उदास झालेय. माझ्यासारख्या कितीजणी असणार? खूप थोड्या . मग वाकीच्यांना आमच्यासारखं सुखी आयुष्य कधी मिळणार? की कधीच नाही? पपा बोला ना!" पपांजवळ उत्तर कुठे आहे?

܀ ܀ ܀
तीन

 अवतीभवती बोडके डोंगर. वुरखुंडी झुडपेही दिसत नव्हती आणि शेती मातीऐवजी दगडगोट्यांनी भरलेली. अशा शेतात पिकावं तरी काय? नि किती? या गावात मतदारांची संख्या आठशे सत्तावन्न. म्हणजे दोनशे उंबऱ्याच गाव. पण सध्याला फक्त शेसव्वाशे माणूस गावात आहे. वाकी सगळे साखर कारखान्यावर कामाला गेले आहेत . या गावात संस्थेने बालवाडी वांधली आहे. विहीर वांधून दिली आहे . हापसा लावला आहे. डोंगरघळीतले पाणी अडविण्यासाठी वांध बांधले आहेत. इथेच कॉलेजच्या पोरांचे राष्ट्रीय सेवा शिविर घेतले. दोन दिवस मुलीही आल्या. शर्टपॅट , पंजावी ड्रेस, स्कर्ट अशा वेशातल्या मुलींभोवती गावातल्या वालगोपाळांचा वेढा पडला. डोईवर केसांना तेल नाही. भुरकटल्या झिपऱ्या सावरत टुकूटुकू नजरेने गावातल्या पोरी शहरातल्या मुलांना न्याहाळत होत्या.
 कुणाच्या अंगावर अंडरपॅटवजा चड्डी नि वर ढगळ पोलका , फाटका झगा , ठिगळांचं परकर पोलकं , शाळेत जाणाऱ्या दोघीचौघीच . चौथीत फक्त तीन मुली शिकतात . पटावरची संख्या दहा पण सातजणी आईबापाबरोबर कारखान्याला गेलेल्या . एकशिक्षकी शाळा . बालवाडी सुरू झाल्यापासून मुलं शाळेत जास्त येतात. मुलींची संख्या पण वाढली आहे, असं मास्तर सांगत होते .
 आम्ही गोल करून वसलो, गाणी सांगितली. मुलींशी दोस्ती केली. गप्पा केल्या, त्यांना विचारलं, "तुम्हाला शिकायला आवडतं का?" सगळ्यांचे चेहरे कोरे .
 "एकदोन शिकलं की खूप मोठं होता येतं . कॉलेजच्या मुलींसारखं शिकायचं ना मग?" एक विद्यार्थी त्यांना विचारतो .
  "मास्तर लई मारतात."

उमलतीचे रंग, गंध ॥२३॥