पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

आज जो प्रसन्न ताजेपणा आहे ,त्याचे श्रेय सेवादलालाच आहे. सेवादलाने महिलांची वेगळी शाखा काढली नाही. कुठे असली, तरी ती अपवादात्मक. स्त्रिया या समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या आणि पुरुषांच्या माथ्यावरचे आभाळ एक आहे. पायाखालची जमीनही एक आहे. मग स्त्रियांसाठी वेगळी शाखा कशाला?
 स्त्री-पुरुषांनी एकमेकांचे सुजाण सहकारी असायला हवे. जीवनातील सर्व क्षेत्रात सहकारी म्हणून निर्भयपणाने वावरायला हवे. ही सुस्पष्ट भूमिका सेवादलाने जाणतेपणाने घेतली होती. आगरकरांच्या महाराष्ट्रात मुलींचे हाल त्यामानाने किंचित कमी. मोकळेपणाही कांकणभर अधिक. त्यामुळे आम्ही पोरी विनधास्त वावरत असू . परंतु विहार वा उत्तरप्रदेश वगैरे प्रांतातील कलापथक दौऱ्याच्या वेळी कधी कधी ताप होई. अशा वेळी मात्र महाराष्ट्राचे खरे दर्शन आतल्या डोळ्यांना स्पर्शून जात असे.
 खेळाच्या मैदानावर अर्धी विजार आणि शर्ट खोवून खेळणाऱ्या मुली राष्ट्र सेवादलाने तीस वर्षापूर्वी तालुक्याच्या गावातही निर्माण केल्या. लोकशाही समाजवाद, विज्ञाननिष्ठा, सर्वधर्मसमभाव, समान संधी, जातीनिरपेक्ष असा एकसंध समाज, स्त्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा इत्यादी सामाजिक न्यायावर आधारलेली जीवनमूल्ये सैनिकांच्या मनात सतत आणि सहजपणे गोंदविली. ज्या काळात राजकारणाला आणि समाजकारणाला व्यवहाराची भाषा कळत नव्हती, तेव्हा सेवादल महाराष्ट्रभर रुजले. फोफावले. राजकारणाला ते गैरसोयीचे वाटले नाही. मागास माणसास न्याय, संधी आणि समृद्धी देण्याची वांधिलकी देशातील एकूण राजकारणाने वा समाजकारणाने स्वीकारली होती, तोवर उत्तम वक्ते, अभ्यासू नेते ,मनस्वी कार्यकर्ते सेवादलाने भारतीय राजकारणाला पुरवले . आज राजकारण हा किफायतशीर धंदा वनला आहे . मूल्य विचारांचे न राहता 'व्यक्तिकेंद्री' झाले आहे . व्यवहाराची गणिते मांडून ते खेळले जाते. गेल्या पंधरावीस वर्षात झालेल्या या वदलाचे दृश्य परिणाम गेल्या पाच वर्षांपासून सर्वांनाच जाणवू लागले आहेत. एकूण समाज सांस्कृतिक समृद्धीकडे जाण्याऐवजी त्यातील सार्वत्रिक उद्ध्वस्त रितेपणा पदोपदी जाणवतो आहे. आपण पूर्वजांच्या कर्तृत्वावर सांस्कृतिक टिमकी भरपूर वडवून घेतलीय .एक प्रसंग आटवतो. शिक्षकांच्या उन्हाळी प्रवोधन वर्गात जर्मनीतील अनुभव सांगण्यासाठी मला वोलावले होते . भाषणानंतर प्रश्नोत्तरे रंगली . एका शिक्षकाने प्रश्न विचारला , "पाश्चात्य देशांत गेल्यावर , भारतीय संस्कृतीची समृद्धी पावलोपावली जाणवली असेल ना?"
 प्रश्न तसा नेहमीचाच, पण नेमका. मी म्हटले. हो जाणवली ना. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या शोधनातून , परिश्रमातून जे ज्ञान मिळवले , कला आणि विज्ञान निर्माण केले , त्या समृद्धीचे कौतुक जगभरची माणसे करतात. पण मला एक भीती पडलीय. अजूनही दलित माणसाने चार पैसे कमावले , घर वांधले वा गाडी घेतली की आपण मनोमन अस्वस्थ होतो . खेड्यातल्या मंदिरात दलित आजही जाऊ

॥ १६॥ वाहत्या वाऱ्यासंगे ...