पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

पूज्य भाऊ रानडे, डॉक्टर अंबिके, यदुकाका थत्ते, भाई वैद्य, प्रधान मास्तर, श्याम पटवर्धन, सिंधुताई मसूरकर अशी मोठी माणसेही रस्त्यावर येऊन काम करीत. आमच्या 'मानवलोक' मध्ये दर गुरुवारी श्रमदान असतेच . कार्यवाहापासून सर्वजण मग्न होऊन काम करतात. सावित्री महिला वसतिगृहातील मुलीऺची अत्यल्प दरात रहाण्या जेवणाची सोय आहे. मात्र रोज एक तास श्रमाचं काम केले पाहिजे हा नियम आहे. एका विद्यार्थिनीला संडास सफाईची लाज वाटे. ते काम करण्यास तिने नकार दिला. पण समूह जीवनाचा भाग म्हणून जगताना तिची तिलाच चूक उमगली. आज ती हे काम मन लावून करते.
 अलीकडे सतत मनात येतेच की राष्ट्रसेवादलाने सेवापथक आणि कलापथक या दोन विभागांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे होते. नेमके का आणि कसे हुकले, याचा चिकित्सक जमाखर्च मोठ्या मंडळींनी मांडायला हवा. हे दोनही विभाग तालुका पातळीवर जाणीवपूर्वक उभे करायला हवेत.
 सामाजिक न्यायाच्या भूमिकेशी वांधील असणाऱ्या सर्व पक्षांचे आणि संघटनांचे कार्यकर्ते आज खंत व्यक्त करतात. उद्याच्या भवितव्यासाठी राष्ट्र सेवादलाची गरज त्यांना जाणवते. सामाजिक जाणिवा असलेले, स्वनिर्णयाचे सामर्थ्य असलेले सुजाण तरुण आज कार्यकर्ते म्हणून मिळत नाहीत. हा स्रोत थांबलाय याचे भान त्यांना आता आलय.
 महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजना राबवली जाते. प्राध्यापक त्याच उत्साहाने रस घेणारे असतील तर ठीक , एरवी अनेक ठिकाणी थातुरमातूर काहीतरी केले जाते.
 पीपल्स पार्टीसिपेशन , ग्रासरुट वर्कर्स , सस्टेनेबल फार्मिंग , श्रमशक्ती . विमेन्स' एमॅन्सिपेशन , वगैरे शब्दांची नाणी आज तेजीत आहेत . पण ही नाणी जेव्हा नव्हती तेव्हा हे सर्व प्रयोग राष्ट्रसेवादलाने केले. नुसते केले नाहीत. तर आग्रहपूर्वक केले.
 आज पूज्य भाऊ रानडे नाहीत. मातृप्रतिष्ठा ही गोष्ट त्यांनीच शिकवावी. नाचून थकलेल्या पायांना शास्त्रीय पद्धतीने तेल चोळणारे भाऊ ... त्यांचे हात आईचे होते. खेड्यातल्या सभेत महिला नसतील तर खवळून आरडाओरडा करीत. शेवटी सरपंचांना म्हातारी माय सभेत आणून वसवावी लागे. महिला असल्याशिवाय भाऊ सभा सुरु होऊ देत नसत. स्त्रियांना झुकते माप देण्याची भूमिका सेवादलाने नेहमीच घेतली. नैतिक विश्वास रुजवला. चाळीस वेचाळीस वर्षांपूर्वी आपल्या किशोरवीन वा तरूण मुलींना पालक सेवादलात वा कलापथकात विश्वासाने पाठवीत. सहजीवनाचा पाठ गिरवताना काहींनी जीवनसाथीही निवडले. मधु दंडवते-प्रमिलाताई, सदानंद वर्दे -सुधाताई, यदुनाथ थत्ते-जान्हवीताई अशा अनेक जोड्या महाराष्ट्रभर पसरलेल्या. चारदोनांचे सूर कदाचित जमलेही नसतील. शक्यता आहे . पण बहुतेकांच्या जीवनात

संस्कार सेवादलाचा ॥१५॥