पान:वाटचाल (Vatchal).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी आई


माझ्या आईचे माहेरचे नाव वेणू. परभणी जिल्ह्यातील नांदापूर हे तिचे माहेर. नांदापूरकर देशपांडे हे मध्यमवर्गीय कुटुंब होते. खाणेपिणे, दूधदुभते पुरेसे. हाती पैसा मात्र नाही. अशा घरात तिचा जन्म झाला. तिला वडील, दोन भाऊ व दोन वहिणी. धाकटा एक भाऊ व एक बहीण. इतर नातेवाईकांचा परिवारही मोठा. माझे आजोबा परभणीला कारकून होते.
आईच्या लग्नाआधी तिच्या दोन्ही बहीणभावांची लग्ने झालेली होती. विशेषतः आईच्या मोठया दोन्ही बहिणींची लग्ने त्या वेळच्या समजुतीनुसार अयशस्वी झालेली होती. एक लग्नानंतर दोन-तीन वर्षांत विधवा झाली, दीड वर्ष वैधव्य भोगून वारली; दुसरी लग्नानंतर पाच-सहा वर्षांत प्रथम

प्रसूतीच्या वेळी वारली. यामुळे आजीचे मन थोडेसे बावरलेले होते. या वेणूचे भवितव्य काय, अशी चिंता होती. म्हणून त्या काळच्या मानाने तिचे लग्न थोडेसे उशिराच झाले, असे मानावयास हरकत नाही.
माझ्या आईचा जन्म इ. स. १९१५ च्या आसपास एखादे वर्ष मागेपुढे. तिचे नाव वेणू का ठेवले ते समजत नाही. डोळ्यांसमोर संत वेणाबाई नसावी. कृष्णाची बासरी समोर असावी. माझे मोठे मामा डॉ. नारायणराव नांदापूरकर अनेकदा मला हे नाव कसे काव्यमय आहे हे सांगत. त्या काळच्या पद्धती नुसार दहाव्या-अकराव्या वर्षी लग्ने होत. माझ्या आईचे लग्न झाले तेव्हा तिला १४ वे वर्ष लागले होते. हे लग्न कुठेतरी १९२८ साली झाले. माझे वडील