पान:वाटचाल (Vatchal).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३६ : वाटचाल

जपत रहायचे; मनाने, इच्छेने त्याचे होऊन रहायचे; असेच मामींचे जीवन गेले. दादा बुद्धिमान, कर्तबगार आणि ध्येयवेडे होते. मामींना फक्त रामाची सावली होती. या सीतेने प्रांजळपणे आपल्याला जसे जाणवले तसे आपल्या संसाराचे वृत्त नोंदविलेले आहे. सीतेने आपल्या व रामाच्या जीवनाची केलेली नोंद म्हणून या आठवणींचे नाव 'सीताराम ' ठेवले आहे. बरोबरीच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला जे रामचंद्रराव नांदापूरकर माहिती आहेत, त्यांचे हे दर्शन नाही. हे सीताबाईला घडलेले रामाचे दर्शन आहे.