पान:वाटचाल (Vatchal).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





अभिवादन


कै. नारायण गोविंद नांदापुरकर हे माझे सर्वांत वडील मामा. पण मामा आणि भाचा असे आमचे संबंध कधीच राहिले नाहीत. आम्ही त्यांना घरी सारेजण 'अण्णा' म्हणत असू. अण्णांच्या स्वभावातील एक मुख्य वैशिष्ट्य असे होते की, ते वडीलकीच्या नात्याने पण बरोवरीच्यांशी वोलावे अशा पद्धतीने सर्वांना उपदेश करीत. पैकी उपदेशाचा भाग आमच्या डोक्यात फारसा कधी शिरायचा नाही. त्यांनी मनाच्या मोठेपणाने आम्हाला बरोबरीच्या नात्याने वागविले म्हणजे आम्हीही त्यांच्याशी स्वातंत्र्य घेऊन बरोबरीच्या नात्याने वागत असू. अण्णांच्या बाबतीत माझी पहिली आठवण अगदी लहानपणची आहे. मी चार अगर पाच वर्षांचा असेन. त्या

वेळी अण्णा औरंगाबादला होते. मामाकडे म्हणून आई बरोबर औरंगाबादला गेलो होतो. माडीच्या पायऱ्यां वरून जो गडगडत मी खाली आलो तो अण्णांनी अलगद मला वरच्यावर झेलले,अशी ती आठवण आहे. पण त्या भेटीतले आता फारसे काही आठवत नाही. नववे वर्ष मला लागले आणि मी अण्णांच्याकडे शिकण्यासाठी म्हणून येऊन दाखल झालो. तिथपासूनच्या पुढच्या सर्व स्मृती मात्र आजही अगदी ताज्या आहेत. माझे आजोबा परभणीला कारकून होते. अण्णा ज्या वेळी सातवी ास पझाले त्या वेळी आजोवांनी अण्णांना केलेला उपदेश पुढे आम्हांला माहीत झाला. आजोबा म्हणाले, "बघ नारायण, आता तू मोठा झालास. देवदयेने तुझे लग्नही झाले आहे. आता