पान:वाटचाल (Vatchal).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो प्रसंग आठवला की-



माझी स्मरणशक्ती तशी बरी आहे. फार चांगली नाही, पण कामापुरती आहे. मला नववे वर्ष चालू होते त्या वेळी या गोष्टीला आरंभ होतो आणि नववे वर्ष संपत आले तेव्हा या गोष्टीचा शेवट होतो. गोष्ट अर्थात माझ्या लहानपणची. तिच्या आरंभी, एका विद्वानाचा खूप राग आणि तिच्या शेवटी, दुसऱ्या विद्वानाने केलेले कौतुक. माझ्या बालमित्रांना ही गोष्ट आवडेल, अशी नाही. पण करणार काय? ती सांगणे भाग आहे. हैद्राबादला एक विद्यापीठ आहे. त्याचे नाव उस्मानिया विद्यापीठ. तिथे मराठीचे एक प्रसिद्ध विद्वान, मराठीचे मुख्य होते. त्यांचे नाव काकासाहेब जोशी. निजामचे संस्थान फार मोठे. त्यात परभणी जिल्हा, त्यात वसमत तालुका. तिथे माझे
आई-वडील आज आहेत, तेव्हाही होते. माझा गाव कुरुंदा या तालुक्यातच आहे. मी चौथीत होतो आणि काकासाहेब जोशी आमच्या घरी पाहुणे म्हणून आले. कोणत्याही बापाला आपल्या मुलाचे कौतुक वाटतेच. माझ्या वडिलांना तर माझे कौतुक फारच फार. काका साहेब जोशी यांच्यासमोर वडिलांनी माझे कौतुक सांगितले, "काकासाहेब, आमचा नरहरी सतत काही तरी वाचतो आणि शंकेखोर फार." काकासाहेबांनी माझे कौतुक केले. मी त्यांच्या पाया पडलो. रात्री जेवणे झाली तोवर सगळे ठीक झाले आणि मग हात दाखवून अवलक्षण करण्याचा योग काकासाहेबांना आला. काकासाहेव जोशी मला म्हणाले, "बाळ, मी तुला एक गोष्ट सांगतो. मी गोष्ट