पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य के. रं. शिरवाडकर राजहंस प्रकाशन, पुणे प्रकाशन - २०१७ पृ. २१६ किंमत - रु. ३३०/-



विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य

 तुम्ही म्हणाल, हा काय शिळ्या कढीला ऊत आणताय. पण तुम्हाला सांगेन, ही खेप 'पहिल्या धारेची' आहे. शेक्सपिअर हे असं रसायन आहे की त्याला शिळी कढी म्हणणे म्हणजे आपल्या साहित्य आस्वादाला ओहोटी लागणे. काही साहित्यिक नि साहित्य कृती अशा असतात की त्यांना 'सदाबहार' शिवाय दुसरा शब्दच वापरता येत नाही. गतवर्ष २०१६ हे जगभर विल्यम शेक्सपिअरचे चारशेवे स्मृतिवर्ष म्हणून साजरे झाले. मराठीत शेक्सपिअरची नाटके आली अठराशे सत्तावन्नच्या बंडात. हा प्रवास आजही अखंड आहे. कुसुमाग्रजांचे धाकटे बंधू के. रं. शिरवाडकर इंग्रजीचे प्राध्यापक होते. अनेक वर्षे आपल्या विद्यार्थ्यांना शेक्सपिअरची नाटके शिकवत राहिले. पण समाधान मिळत नव्हते. अजून आपणास कळलेला शेक्सपिअर पूर्ण सांगू शकलो नाही याची खंत म्हणून त्यांनी सन १९७६ मध्ये 'विल्यम शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य' ग्रंथ लिहिला. त्याला पु. ल. देशपांडेंची आस्वादक प्रस्तावना आहे. शेक्सपिअरच्या ४०० व्या स्मृतिवर्षानिमित्त या ग्रंथाची 'राजहंस' आवृत्ती दोन - तीन महिन्यापूर्वी हाती पडली. बऱ्याच नव्या गोष्टींची भर यात आहे. त्या सांगाव्यात म्हणून

हा शब्दप्रपंच!

वाचावे असे काही/८२