पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


विस्मृतिचित्रे - डॉ. अरुणा ढेरे श्रीविद्या प्रकाशन, पुणे प्रकाशन - १९९८ पृ. ४२८ किंमत - रु. ३००/-



विस्मृतिचित्रे

 ज्यांना कुणाला महाराष्ट्रातील स्त्री विकासाचा पट आणि आलेख समजून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी चांगला वाचन पाठ ठरेल असे पुस्तक आहे "विस्मृतिचित्रे'. ते लिहिलंय डॉ. अरुणा ढेरे यांनी. या पुस्तकाचा आणि कोल्हापूरचा ऋणानुबंध आहे. कारण या चरित्र संग्रहात संस्थानकाळातील पहिल्या 'फिमेल ट्रेनिंग कॉलेज' च्या पहिल्या लेडी सुपरिंटेंडेंट श्रीमती रखमाबाई केळवकर यांच्या विकासाचे चित्र आहे. नंतर त्यांची कन्या डॉ. कृष्णाबाई केळवकर या कोल्हापूर संस्थानच्या पहिल्या 'लेडी सर्जन' झाल्या आणि कोल्हापुरात स्त्री रोग चिकित्सा विभाग सुरू झाला त्यांची धडपड समजून घेता येते. त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या सहाध्यायी. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणेच्या पहिल्या विद्यार्थिनी. 'सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर त्या वेळी फर्ग्युसन कॉलेज, पुणेचे प्राचार्य होते. त्यांनी कृष्णाबाई केळवकरांना कॉलेजात प्रवेश दिला म्हणून लोकमान्य टिळकांनी 'केसरी'तून गहजब केला होता. गंमत म्हणजे फर्ग्युसन कॉलेजातील कृष्णाबाईंच्या वर्गात त्यांच्यासाठी चिकाचा पडदा टाकण्यात आला होता. या पुस्तकात आणखी एक हृद्य चरित्र आहे ते म्हणजे आपल्या इंदुमती राणीसाहेबांचे. राजर्षी छ. शाहू महाराज स्त्री शिक्षण व विकासाचे समर्थक कसे होते, त्यासाठी त्यांना काय काय सोसावं लागलं ते समग्रपणे मुळातूनच

वाचावे असे काही/७५