पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


फिजीद्वीप में मेरे २१ वर्ष - तोताराम सनाढ्य प्रकाशक - बनारसीदास चमुर्वेदी, ज्ञानपुर, बनारस प्रकाशन - हिंदी समय अ‍ॅट कॉम प्रकाशन- १९७२ पृ. २४०, मूल्य रु. ४५०/-


फिजीद्वीप में मेरे 21 वर्ष

 परवा मी हिंदीचा जागतिक इतिहास लिहायचा म्हणून संदर्भ गोळा करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात एक महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे आपली हिंदी भाषा विदेशात कुणी लेखक, भाषांतरकार, ख्रिश्चन मिशनरींनी नाही नेली. ती नेली एका वेठबिगार गुलामाने. त्याचे नाव आहे तोताराम सनाढ्य. तोताराम अवघे तिसरी शिकलेले पण शहाणपण उपजतच त्यांच्यात होतं. लहानपणीच वडील वारल्यामुळे निर्धन आई सांभाळ करायची. मोठा भाऊ पोट पोटासाठी कलकत्याला गेलेला. आपल्याकडे चाकरमाने मुंबईला जातात, तसा तो गेलेला. हातपाय हालवायचे म्हणून तोताराम प्रयागला गेले. रस्त्यावर हा गृहस्थ वेडापिसा फिरतो असं हेरलं नि एका माणसाने त्याला काम द्यायचं आमिष दाखवून आपल्या घरी नेलं. तिथं एका खोलीत त्याच्यासारखी चांगली शंभर एक माणसं कोंबून नि कोंडून ठेवलेली दिसली. त्यात पुरुष होते तसे, स्त्रियाही होत्या. तोताराम त्यापैकीच एक झाला. तोतारामला कामाचं आमिष दाखवणारा तो माणूस होता दलाल. तो अशी गरीब, गांजलेली माणसं शोधायचा नि इंग्रजांना गुलाम म्हणून विकायचा. ही गोष्ट १९०४ मधली. तोताराम यांना फिजी बेटावर पाठवण्यात आले, ते वेठबिगार मजूर म्हणून तिथे ते २१ वर्षे राहिले. पहिली पाच वर्षे वेठबिगार

वाचावे असे काही/७१