पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहतं. ते श्वास रोखून वाचायला लागतं. वाचताना आपल्याला मायग्रेन होतो का अशी भीती. हे चरित्र म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य, अहिंसा, शांती, मानवाधिकाराची मागणी करणाऱ्या एका देशाची शोकात्म कथा आहे. ती वाचत असताना लक्षात येतं की ज्या देशात मुलं लहानपणीच बंदूक घेऊन आपल्या आई-बहिणींचे प्राण, इज्जत वाचावी म्हणून लढायला लागतात तिथे बालपण नुसतं कोमेजलेले नसते, ते हरवलेले असते. दूध न मिळणारा आपला शेजारी देश. आपण मात्र आपल्या दुधावर घट्ट साय का येत नाही म्हणून दुःखी! एक गोकुळ दुधाविना मरणारं नि दुसरं दुधाच्या महापुरात वाहून चाललेलं! तरी दुःखीच.

◼◼

वाचावे असे काही/७०