पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'आठवणीतल्या कविता' पुस्तकाचे चार भाग जन्माला कसे आले, हे समजून घेणंही रंजक ठरावे. मराठीचे अमर शिल्प ‘स्मृतिचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांची नातसून मायावती अशोक टिळक बालपणी शिकलेली एक कविता शोधत होत्या. कविता होती - 'पडू आजारी मौज हीच वाटे भारी'. शाळा चुकवण्यासाठी आजारी पडणाऱ्या शाळगड्याची कविता. किंवा आजारी पडल्यावर मिळणाऱ्या शुश्रूषा व साग्रसंगीत आहाराची कविता. एका भारतीय आजोबांनी ती पाठ केलेली असते. ते अमेरिकेत जाऊन स्थिरावतात. त्यांचा नातू आजारी पडतो. त्याला ती म्हणून दाखवायची असते नि पुस्तकही दाखवायचं असतं म्हणून ते तमाम भारतीयांना कविता शोधायच्या कामाला लावतात. या शोधात चांगल्या साडेतीनशे कविता जमतात नि त्यांची पुस्तके होतात. तुम्हाला हे सांगून खरं वाटणार नाही की हे पुस्तक येणार कळताच अ‍ॅडव्हान्स बुकिंग फुल्ल! ही असते बालपणीच्या आठवणींची ताकद. या पुस्तकांच्या आवृत्यांवर आवृत्या निघाल्या. माझ्या संग्रही असलेली दहावी आवृत्ती आहे सन २००६ची. आज विसावी आवृत्ती आली असेल तर आश्चर्य वाटायला नको.

 मला आठवतं, आमच्या लहानपणी नवी पुस्तके अपवाद मुलेच खरेदी करीत. वरच्या वर्गात गेलेल्यांची पुस्तके निम्म्या किमतीत घेण्याचा रिवाज होता. वह्याही नवीन मिळत नसत. पास झालेल्या वर्षातील वह्यांची कोरी पाने जमा करायची. त्यांच्या शिवून वह्या करायच्या. वर्तमानपत्राचे कव्हर घातले की झाली नवी वही तयार. विशेष म्हणजे एकाच वहीत रेघी, तिरेघी पाने असत. ही रफ वही असायची. गृहपाठाच्या वह्या फक्त नव्या असत. एका पेन्सिलीचे तुकडे करून भावा, बहिणीत वाटले जात. अख्खी पेन्सिल फक्त दुकानात. शाळेत 'दिल के टुकडे हजार'. तीच गोष्ट सूच्या सुट्टीतील गोळ्यांची. एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याचा आमच्या पिढीचा अनुकरणीय आदर्श असल्याने दोन मित्रांनी दोन स्वतंत्र गोळ्या खाणे स्वप्नातच घडे. प्रत्यक्षात एका गोळीचे सदऱ्याच्या टोकात गोळी धरून दाताने केलेल्या दोन तुकड्यांच्या गोळ्यात बालपण केव्हा सरले ते समजलेच नाही.

 'आठवणीच्या कविता' वाचत असताना नुसत्या कवितांनी भरती येत नाही. भरती येते बालपणीची अन् सुरू होते प्रौढत्वाची ओहोटी! आठवू लागतात जीव लावणारे शिक्षक. नापास करणारे गुरुजी. वर ढकलणारे हेडमास्तर. मोरपिस देणारी मैत्रीण न आठवली तरच आश्चर्य! पेन्सिलला

वाचावे असे काही/५८