पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आठवणीतल्या कविता (भाग १ ते ४) संपादक - महाजन, बरवे, तेंडुलकर, पटवर्धन. मौज प्रकाशन, मुंबई. पृष्ठे - सरासरी १६०/- रु. किंमत - प्रत्येकी रु. ८०/- प्रकाशन - १९८९


आठवणीतल्या कविता

 माणसाच्या जीवनात सर्वाधिक संस्मरणीय कालखंड कोणता असेल तर तो बालपणाचा! बालपण म्हणजे खेळ, सवंगडी, शाळा, गोष्टी, गाणी याचं गारूड, 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा', 'अहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लावले', 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे' असं 'बालपणीचा काळ सुखाचा' वर्णन करणाऱ्या ओळींचं जीवन म्हणजे बालपण. लहानपणी शाळेत पाठ केलेल्या कविता आयुष्यभर साथ देत मना, कानात गुणगुणतच आपण मोठे होतो. आपण जसजसे मोठे होतो तसतसे बालपणीचं स्मरणरंजन मोहक वाटू लागतं. शाळेतील पाठ्यपुस्तकांतील कवितांचा खजिना, संग्रह उपलब्ध आहे. 'आठवणीतल्या कविता' त्याचं नाव. या पुस्तकाचे एक दोन नव्हे, चांगले चार भाग उपलब्ध आहेत. आणि या चार भागात सुमारे साडेतीनशे कविता उपलब्ध आहेत. या कविता वाचत आपण परत लहान होतो, हे या 'आठवणीतल्या कविता'चं वैशिष्ट्य.

 'थोर तुझे उपकार आई', 'छान किती दिसते, फुलपाखरू', 'पतंग उडवू चला गड्यांनो', 'लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली', 'देवा तुझे किती सुंदर आकाश', "दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल

वाचावे असे काही/५६